रशियाचे गिफ्ट पडले १७ लाखांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:29 IST2021-02-05T04:29:07+5:302021-02-05T04:29:07+5:30
मुंबई : सोशल मीडियावरून ओळख झालेल्या रशियाच्या तरुणाने पाठविलेल्या महागड्या गिफ्टसाठी कुर्ला येथील घटस्फोटित महिलेला १७ लाख २२ हजार ...

रशियाचे गिफ्ट पडले १७ लाखांना
मुंबई : सोशल मीडियावरून ओळख झालेल्या रशियाच्या तरुणाने पाठविलेल्या महागड्या गिफ्टसाठी कुर्ला येथील घटस्फोटित महिलेला १७ लाख २२ हजार गमवावे लागले आहेत. याप्रकरणी विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
............................
आईवर बलात्कार केल्याचा टीव्ही कलाकारावर आरोप
मुंबई : ओशिवरा परिसरात राहत असलेल्या ५८ वर्षीय सावत्र आईवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून ४० वर्षीय टीव्ही कलाकाराविरुद्ध ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यात त्यांच्यात मालमत्तेवरूनही वाद असल्याचे समोर आले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
............................
मालाडमधून आठ लाखांचा गुटखा जप्त
मुंबई : मालाड परिसरातून आठ लाख ४० हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. शनिवारी ही कारवाई करण्यात आली असून, पाेलीस आराेपीची कसून चाैकशी करत आहेत.
............................