Russian youth stunt on Bandra-Worli sea link | वांद्रे-वरळी सी लिंकवर रशियन तरुणांची स्टंटबाजी

वांद्रे-वरळी सी लिंकवर रशियन तरुणांची स्टंटबाजी

पोलिसांनी ठोकल्या बेड्या

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : वांद्रे-वरळी सी लिंकवर स्टंटबाजी करणाऱ्या रशियन दुकलीला वरळी पोलिसांनी अटक केली. दोघेही सर्कसमधील कलाकार आहेत. या प्रकरणी वरळी पोलीस अधिक तपास करत आहेत.

गेल्या वर्षभरापासून ही रशियन दुकली भारतात राहण्यास आहे. शुक्रवारी वांद्रे वरळी सी लिंकवरून जात असताना, यापैकी एक जण सी लिंकच्या मध्यावर चढून स्टंट करत होता, तर दुसरा साथीदार त्याचे व्हिडीओ काढत होता. तेथून जाणाऱ्या वाहनचालकाने हा प्रकार बघून पोलिसांना कळविले. घटनेची वर्दी मिळताच, वरळी पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी तत्काळ दोघांना अटक केली.

या दाेघांना नुकतीच वांद्रे येथील एका स्टुडिओत नोकरी मिळाली होती. दोघेही सर्कसमधील कलाकार असल्यामुळे त्यांना सी लिंक पाहून त्यावर स्टंट करण्याची इच्छा झाल्याचे त्यांच्या चौकशीतून समोर आले.

....................

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Russian youth stunt on Bandra-Worli sea link

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.