पेट्रोल पंपावर उसळली वाहनांची गर्दी

By Admin | Updated: May 19, 2015 00:29 IST2015-05-18T22:41:46+5:302015-05-19T00:29:03+5:30

रत्नागिरी : बाटल्या, कॅनमधूनही पेट्रोल घेण्यासाठी लांबच लांब रांगा...

The rush of vehicles on the petrol pump | पेट्रोल पंपावर उसळली वाहनांची गर्दी

पेट्रोल पंपावर उसळली वाहनांची गर्दी

रत्नागिरी : पेट्रोल टंचाईने हैराण झालेल्या वाहन चालकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील शिर्के पेट्रोल पंपासमोर मोठी गर्दी केली होती. दुुचाकी, चारचाकी वाहने व बाटल्यांमध्ये पेट्रोल घेण्यासाठी पंपावर प्रचंड गर्दी उसळली होती. शहरातील सर्वच वाहने पेट्रोल मिळेल या आशेने काही तास या पंपावर रांग लावून उभी करण्यात आली होती. पंपापासून ते शहरी बसस्थानकापर्यंत रिक्षांची लांब रांग लागली होती. सकाळी ९ वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत या रांगेतील रिक्षा व उसळलेली गर्दी कमी झाली नव्हती.रविवारी सायंकाळपासून शहर व परिसरातील सर्वच पेट्रोल पंप पेट्रोलविना रिकामे झाले होते. त्यामुळे वाहनचालक निराश होऊन घरी परतले होते. मात्र आज सकाळी केवळ शिर्के पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध झाल्याचे वृत्त पसरले अन अवघी रत्नागिरी सकाळी ९ वाजल्यापासूनच या पंपासमोर जमा झाल्याचे चित्र दिसू लागले. जिल्हाधिकारी कार्यालय समोरच असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली. ही कोंडी सोडविताना पोलिसांची दमछाक झाली. वाहनचालक कसेही रांगा लावत असल्याने मुख्य रस्त्याचा निम्मा भाग पेट्रोलसाठी थांबलेल्या गाड्यांनीच भरून गेला होता. शहर वाहतूक पोलीस बराचवेळ वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत होते. (प्रतिनिधी)


चिपळुणातही टंचाई
चिपळुणात चार पेट्रोलपंपासह शहरालगतच्या तीनही पेट्रोलपंपामध्ये पेट्रोल व डिझेलचा साठा कमी असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आज पेट्रोल व डिझेलचा कं पनीकडून साठा उपलब्ध झाला नाही. शिवाय उन्हाळी सुट्टी असल्याने प्रवाशांची व पर्यटकांची संख्याही महामार्गावर कमालीची वाढली आहे. वाढती वाहने व नियंत्रित साठा यामुळे ही टंचाई निर्माण झाली आहे.



भारत पेट्रोलियमची रिफायनरी दुरुस्तीसाठी बंद करण्यात आल्याने व हिंदुस्थान पेट्रोलियमची इंधनवाहू रेल्वे वॅगन लोणावळा येथे तांत्रिक कारणाने अडकल्याने रत्नागिरीत निर्माण झालेली पेट्रोल टंचाई समस्या मंगळवारी सुटण्याची शक्यता आहे.


सोमवारी दुपारी कॅन, बाटल्यांमधून पेट्रोल दिले जात असल्याने काही काही वाहनधारकांनी आक्षेप घेतला. बाचाबाची झाली होती. त्यानंतर बाटल्यांतून पेट्रोल देणे बंद झाले. मात्र सायंकाळी रांगेतील अनेकांच्या हाती पिशव्या दिसून येत होत्या. त्यामध्ये रिकाम्या बाटल्या, कॅन्स होती.

1पुण्याहून मंगळवारी पेट्रोल-डिझेलवाहू टॅँकर रत्नागिरीत होणार दाखल.
2मंगळवारी दुपारपर्यंत रत्नागिरीतील पेट्रोल टंचाई समस्या दूर होण्याची वाहनचालकांना आशा.
3रीक्षाचालक तीन-तीन तास पेट्रोलसाठी रांगेत राहिल्याने प्रवाशांना रीक्षा मिळणे कठीण बनले. त्यामुळे पायी प्रवास करावा लागला.

गुहागर शहरासह तालुक्यातही पेट्रोलची मोठी टंचाई जाणवत आहे. गुहागर तहसीलदार कार्यालयासमोरील पंपावरच पेट्रोल मिळत असल्याने याठिकाणी नागरिकांबरोबरच वाहनांचीही लांबच लांब रांग लागली होती.

रत्नागिरी शहरातही रविवारी दुपारपासून पेट्रोलटंचाई जाणवत आहे. सोमवारी शहरातील एकमेव पेट्रोलपंपावर पेट्रोल मिळत असल्याचे कळताच वाहनांची आणि नागरिकांची लांबच लांब रांग लागली होती. जयस्तंभ ते बसस्थानक एवढी ही मोठी रांग होती.

Web Title: The rush of vehicles on the petrol pump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.