ग्रामीण रुग्णालय कागदावरच

By Admin | Updated: August 26, 2014 01:25 IST2014-08-26T01:25:32+5:302014-08-26T01:25:32+5:30

ग्रामीण भागातील गोर-गरीब आदिवासी तसेच सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याची चांगली सोय व्हावी या हेतूने शासनाने ५ वर्षापूर्वी वाणगांव येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर केले

Rural Hospital on paper | ग्रामीण रुग्णालय कागदावरच

ग्रामीण रुग्णालय कागदावरच

शौकत शेख, डहाणू
ग्रामीण भागातील गोर-गरीब आदिवासी तसेच सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याची चांगली सोय व्हावी या हेतूने शासनाने ५ वर्षापूर्वी वाणगांव येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर केले. परंतु रुग्णालयाच्या इमारतीसाठी या भागात जागा मिळत नसल्याने वाणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेतच नवीन इमारत उभी करण्याचे निश्चित झाले, परंतु आरोग्य केंद्राची जागा जि. प. च्या नावाने असल्याने ती जागा महाराष्ट्र शासनाच्या नावावर करण्यासाठी पाच वर्षापूर्वी जि. प. ने ठराव करून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय (जव्हार) येथे पाठविले. मात्र तिथे योग्य त्या पाठपुराव्याअभावी ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीविना येथील हजारो रुग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे.
डहाणूसारख्या आदिवासी बहुल क्षेत्रात एकुण ९ प्राथमिक आरोग्य केंद्रे असून डहाणू शहरात उपजिल्हा रुग्णालय, तर कासा येथे ग्रामीण रुग्णालय आहे. डहाणूच्या बंदरपट्टी भागात वसलेल्या सुमारे पंचवीस ते तीस गावांना केवळ चिंचणी, वाणगांव, प्रा. आरोग्य केंद्राचा आधार असल्याने शिवाय या आरोग्य केंद्रात पुरेश्या प्रमाणात औषधसाठा तसेच यंत्रसामग्री, सोयीसुविधा नसल्याने येथील रुग्णांना रात्री - बेरात्री गुजरात राज्यातील रुग्णालयात धाव घ्यावी लागते. त्यामुळे येथील हजारो ग्रामस्थांच्या आरोग्याचा विचार करून शासनाने ५ वर्षापूर्वी वाणगाव येथे तीस खाटांचे ग्रामीण रुग्णालय मंजूर केले, त्यासाठी तीन कोटीचा निधीही उपलब्ध करून देण्यात आला. त्याकरिता वाणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळच असलेल्या चंद्रनगर येथे स्थलांतर करून त्याच जागी ग्रामीण रूग्णालयाची इमारत उभी करण्यासाठी जि. प. ने ठराव करून सातबारा महाराष्ट्र शासनाच्या नावावर करण्याचा प्रस्ताव पाठवला.

Web Title: Rural Hospital on paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.