Join us
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या लोकलमध्ये पुन्हा अश्लील चाळे, आरोपीला चोप देत केले रेल्वे पोलिसांच्या हवाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2018 20:36 IST

विरार-चर्चगेट धावत्या लोकलमध्ये तरुणीला पाहून अश्लील चाळे करणा-या तरुणाला प्रसंगावधान राखणा-या प्रवाशांनी चोप देत रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

मुंबई : विरार-चर्चगेट धावत्या लोकलमध्ये तरुणीला पाहून अश्लील चाळे करणा-या तरुणाला प्रसंगावधान राखणा-या प्रवाशांनी चोप देत रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. अविजीत उत्तम सिंग असे या तरुणाचे नाव असून या प्रकरणी अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विरार येथील जीवदानी देवींच्या दर्शन घेतल्यानंतर नीरज कश्यम यांच्या परिवाराने सायंकाळी ५ वाजून १५ मिनिटांची विरार-चर्चगेट लोकल पकडली. रविवार असल्याने लोकलमध्ये गर्दी नव्हती. बोरिवली स्थानकांदरम्यान आरोपीने लोकलमध्ये प्रवेश केला. लोकल सुरू झाल्यानंतर आरोपीने पँटची चैन खाली करत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. हे पाहून लोकलमधील पीडित कुटुंबीय घाबरले.मात्र अन्य प्रवाशांनी धाडसाने त्याच्या मुसक्या आवळत त्याला चोप दिला. अंधेरी स्थानकात प्रवाशांनी या आरोपीला रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपी मूळचा पालघर येथील असून तो २९ वर्षांचा आहे. पीडित कुटुंबीय आणि सहप्रवाशांच्या मदतीने आरोपीवर गुन्हा नोंदवण्यात आला असल्याची माहिती अंधेरी रेल्वे पोलिसांनी दिली.