चांदिवलीतील शाळेची उच्च न्यायालयात धाव

By Admin | Updated: August 13, 2015 00:40 IST2015-08-13T00:40:36+5:302015-08-13T00:40:36+5:30

शाळेवर हातोडा पडू नये, म्हणून अखेर चांदिवलीमधील बांगर विद्यालयाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर उद्या, गुरुवारी सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी मंगळवारनंतर बुधवारीही

Run in the High School of Chandivali school | चांदिवलीतील शाळेची उच्च न्यायालयात धाव

चांदिवलीतील शाळेची उच्च न्यायालयात धाव

मुंबई : शाळेवर हातोडा पडू नये, म्हणून अखेर चांदिवलीमधील बांगर विद्यालयाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर उद्या, गुरुवारी सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी मंगळवारनंतर बुधवारीही जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी कारवाई करण्यासाठी दाखल झाले होते. परंतु कारवाई तात्पुरती टळली. जिल्हाधिकारी कार्यालयाने आता १४ आॅगस्ट ही तारीख दिली आहे. शाळे पाडण्यात येऊ नये म्हणून शेकडो विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते.
विकासकाच्या संगनमतामुळे कारवाईचा बडगा उगारण्यात येत असल्याचा आरोप शाळा प्रशासनाने केला आहे. मंगळवार आणि बुधवारी महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी तेथे होते. विपरीत घटना घडू नये म्हणून पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. शाळा प्रशासनाने याचिकेत २०१५-१६साठी तरी विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात यावा, अशी विनंती करण्यात आल्याचे स्थानिक नगरसेवक ईश्वर तायडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Run in the High School of Chandivali school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.