कुणाल पाटीलांना खंडणीचा फोन

By Admin | Updated: March 11, 2015 00:05 IST2015-03-11T00:05:41+5:302015-03-11T00:05:41+5:30

सोमवारी येथील मानपाडा परिसरातील बिल्डर कुणाल पाटील यांना ५० लाखांच्या खंडणीसाठी रवी पुजारी गँगचा फोन आला असून ते

Rumors phones to Kunal Patil | कुणाल पाटीलांना खंडणीचा फोन

कुणाल पाटीलांना खंडणीचा फोन

अनिकेत घमंडी, डोंबिवली
सोमवारी येथील मानपाडा परिसरातील बिल्डर कुणाल पाटील यांना ५० लाखांच्या खंडणीसाठी रवी पुजारी गँगचा फोन आला असून ते न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या संदर्भात मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सोमवारी ज्या बांधकाम व्यावसायिकाला धमकीचा कॉल आला होता तो दुपारी ३ च्या सुमारास आला होता, त्याचा क्रमांक मिळवत पोलिस यंत्रणेने माहिती मिळवण्याचे काम सुरु केले आहे. मात्र मंगळवारी संध्याकाळपर्यंत तरी कोणतीही ठोस माहिती समोर आली नाही. येथील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या हत्येचा कट मुंबई क्राईम ब्रँचने उधळला होता, त्यातील आरोपींना पोलिसांनी मुलुंडमधून अटक केली. परंतु तरीही धमकी सत्र थांबलेले नाही. त्यामुळे पोलिसांसमोरील डोकेदूखी वाढली असून सुरक्षा यंत्रणेला अधिक सक्षमतेने काम करण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट होत आहे. कल्याण क्राईम ब्रँचने गेल्या काही दिवसांपासून रेकॉर्डवरील तब्बल ४० जणांची नावे काढली, त्यातील काही जणांचे निधन झाले असून बहुतांशी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आता स्वतंत्र व्यवसायात व्यस्त असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तरीही पोलिसांनी जे संबंधित आहेत त्या सर्वांना बोलावून चौकशी केली असून संपर्कात राहण्याच्या सूचना दिल्याचेही एका वरिष्ठ पोलिस अधिका-याने ‘लोकमत’ला सांगितले. या चौकशीत डोंबिवलीतील एका बड्या व्यक्तिलाही बोलावण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्या सर्वांची सध्याची माहिती, त्यांचे संपर्क क्रमांक आदीसह अन्य गोपनीय माहिती गोळा करण्याचे काम सुरु आहे.

Web Title: Rumors phones to Kunal Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.