अफवांचे बाजार फुलू लागले!

By Admin | Updated: October 4, 2014 02:17 IST2014-10-04T02:17:48+5:302014-10-04T02:17:48+5:30

मतदानाची तारीख जवळ येऊ लागली तसे सगळे पक्ष राजकीय कुरघोडय़ा कशा वाढवता येतील याच्या प्रयत्नात आहेत. तर काहींनी आपल्या नेतेगिरीचे घोडे पुढे दामटणो सुरू केले आहे.

Rumors of the market started! | अफवांचे बाजार फुलू लागले!

अफवांचे बाजार फुलू लागले!

>मुंबई  : मतदानाची तारीख जवळ येऊ लागली तसे सगळे पक्ष राजकीय कुरघोडय़ा कशा वाढवता येतील याच्या प्रयत्नात आहेत. तर काहींनी आपल्या नेतेगिरीचे घोडे पुढे दामटणो सुरू केले आहे. मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी या सगळ्या गोष्टी चालू असून, मतदानाची तारीख जशी जवळ येईल तशा या अफवा आणखी वाढत जातील, असे वरिष्ठ पोलीस अधिका:यांचे मत आहे.
भाजपा-शिवसेना वेगळे लढणार असतील तर दोन्ही काँग्रेसही वेगळ्या लढतील असे सगळे नेते खाजगीत सांगत होते. भाजपाने युती तोडण्याची घोषणा करताच राष्ट्रवादीनेही वेगळे लढण्याची घोषणा करून टाकली. मात्र याचा तत्काळ राजकीय फायदा काँग्रेसने घेतला. भाजपाची पत्रकार परिषद होताच अध्र्या तासातच राष्ट्रवादीने कशी काय पत्रकार परिषद घेतली? हा राष्ट्रवादीचा डाव आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगून टाकले. आता प्रत्येक सभेत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आम्ही राष्ट्रवादीसोबत जाणार नाही, असे ठासून सांगताना दिसत आहेत. तर तिकडे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मात्र ‘शिवसेना कधीच संपणार नाही’ असे विधान करून राजकीय संभ्रम वाढवला तर राज ठाकरे यांनीदेखील भाजपा-राष्ट्रवादीची मिलीभगत जुनी असल्याचे सांगत भरच टाकली.  दुसरीकडे, ‘जे बाळासाहेबांना जमले नाही ते यांना जमणार का.?’ अशी प्रतिक्रिया भय्यू महाराजांनी केलेल्या मध्यस्थीवर एका ठाकरेंनी नोंदवली होती. 
मनसे आणि शिवसेना एकत्र येणार अशा बातम्या सुरू झाल्या. त्यातच उद्धव ठाकरे यांनी ‘राजला फोन केला तर बाकीच्यांच्या तब्येती का बिघडतात,’ असा सवाल केला. शिवाय युती तुटली तरीही केंद्रात मंत्रिपद कशाला ठेवले? असा आरोप राज यांनी करूनही उद्धवनी त्याला प्रतिउत्तर दिले नाही. (विशेष प्रतिनिधी)
 
ज्या मतदारसंघात भाजपा कमी असेल तेथे शिवसेनेसोबत जा, किंवा जेथे सेना कमी पडत असेल तेथे मनसेसोबत जा.. अशा अफवादेखील पसरवल्या जातील, काही ठिकाणी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावरील गडबडीर्पयतच्या अफवा पसरतील, अशी राज्य गुप्तचर विभागाची माहिती आहे. 

Web Title: Rumors of the market started!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.