रुळे माळ कंठी गणेशाची...
By Admin | Updated: September 11, 2015 00:49 IST2015-09-11T00:49:03+5:302015-09-11T00:49:03+5:30
गणेशाच्या सजावटीमध्ये रोषणाई, ज्वेलरी या विविध वस्तूंसोबत आकर्षक माळा बाजारात आल्या असून त्यांनी बाजारपेठ फुलली आहे. यंदा मोती आणि डायमंड बॉल्समधील कंठी नव्याने बाजारात आल्या आहेत.

रुळे माळ कंठी गणेशाची...
- जान्हवी मोर्ये, ठाणे
गणेशाच्या सजावटीमध्ये रोषणाई, ज्वेलरी या विविध वस्तूंसोबत आकर्षक माळा बाजारात आल्या असून त्यांनी बाजारपेठ फुलली आहे. यंदा मोती आणि डायमंड बॉल्समधील कंठी नव्याने बाजारात आल्या आहेत. त्यांना ग्राहकांकडून अधिक पसंती मिळत आहे.
विक्रे त्या वृषाली नुरुरे यांनी सांगितले की, बाजारात गणेशासाठी मोती कंठी, सॅटीन कंठी, डायमंड बॉल्स कंठी अशा तीन प्रकारांत माळा आलेल्या आहेत. पण, ग्राहकांची पसंती मोत्याच्या माळांना आहे. बाजारात मोती कंठीच्या माळा ५० रु पये ते २५० रु पयांच्या रेंजमध्ये उपलब्ध आहेत. तर, सॅटीन कंठीच्या माळा १२० ते ५०० रुपयांच्या घरात आहेत. डायमंड बॉल्सच्या माळा या कमीतकमी २५० रु पयांपासून ६०० रु पये किमतींपर्यंत आहेत. याशिवाय, पानाफुलांच्या, काचेच्या लडी असलेल्या माळाही पाहायला मिळत आहेत. यामध्ये मोगऱ्याच्या लडी ५० ते १०० रुपयांमध्ये मिळत आहेत. तर, गोंडा एक लड १०० रुपयांना आहे. काचेच्या १० लडी ७०० रुपयांना आहेत. चायना मोत्यांची दहाची लड २५० रु पयांना आहे. तर, क्रिस्टल मटेरिअलची लड १२० रुपयांच्या किमतीत आहे.
गणेशाची सजावट करताना गणेशभक्तांना नवा पॅटर्न हवा असतो. यंदा माळांच्या किमतींत फार लक्षणीय भाववाढ नाही. ती दहा टक्के आहे. त्यामुळे खरेदीवर फारसा फरक पडत नाही. कारण, वर्षातून एकदाच गणेशोत्सव येतो. किमतीपेक्षा भक्तीची भावना मोठी असते. गणेशासाठी सब कुछ अशी भावना भक्तांची असते. त्यामुळे भक्तीची माळ भक्ताला महाग वाटत नाही.
सजावटीचे तोरण मोत्यांच्या पॅटर्नमध्ये ४०० ते १२०० रु पये किमतीला आहे. कापडी तोरण २०० ते २६० रु . उपलब्ध आहे. रांगोळीचे दहा रंगांचे पाकीट ८० रु पयांना आहे. रांगोळीचे तयार साचे १० पासून ५० रु पयांच्या रेंजमध्ये आहेत.