Join us

'संघाला व्यक्तींची संघटना म्हणून मान्यता', सरसंघचालकांनी केलं स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 11:02 IST

RSS News: नोंदणीशिवाय संघटनेचे कामकाज चालविण्याचा आरोप करणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी सांगितले की, आमच्या संघटनेला व्यक्तींची संघटना म्हणून मान्यता आहे.

बंगळुरू - नोंदणीशिवाय संघटनेचे कामकाज चालविण्याचा आरोप करणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी सांगितले की, आमच्या संघटनेला व्यक्तींची संघटना म्हणून मान्यता आहे.

संघाची स्थापना १९२५ मध्ये झाली. तेव्हा आम्ही ब्रिटिश सरकारकडे नोंदणी करावी, अशी अपेक्षा करता का? स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने नोंदणी अनिवार्य केली नाही. आम्हाला व्यक्तींची संघटना म्हणून वर्गीकृत केले जाते आणि आम्ही एक मान्यताप्राप्त संघटना आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, आमच्यावर तीन वेळा बंदी घालण्यात आली. अशा परिस्थितीत सरकारने आम्हाला मान्यता दिली आहे. जर आम्ही अस्तित्वात नसतो, तर त्यांनी कोणावर बंदी घातली? अनेक गोष्टी नोंदणीकृत नाहीत. हिंदू धर्मदेखील नोंदणीकृत नाही.

कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा नाहीभागवत यांनी स्पष्ट केले की, संघ कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देत नाही. संघाचे काम समाजाला एकत्र करणे आहे आणि राजकारणात फूट पाडली जाते. म्हणून आम्ही राजकारणापासून दूर राहतो. आम्ही मतांच्या राजकारणात भाग घेत नाही. आम्हाला कोणत्याही एका पक्षाशी विशेष प्रेम नाही. संघाचा कोणताही पक्ष नाही. कोणताही पक्ष आपला नाही आणि सर्व पक्ष आपले आहेत, कारण ते भारतीय आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : RSS Recognized as Organization of Individuals, Clarifies Sarsanghchalak

Web Summary : RSS Chief Mohan Bhagwat clarified that the RSS is recognized as an organization of individuals, not requiring registration. He emphasized the RSS's focus on uniting society, staying away from divisive politics, and maintaining neutrality towards all political parties as they are all Indian.
टॅग्स :राष्ट्रीय स्वयंसेवक संघमोहन भागवत