मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:06 IST2021-06-11T04:06:11+5:302021-06-11T04:06:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मालाड मालवणी येथे इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या रहिवाशांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याची ...

Rs 5 lakh to the heirs of the deceased - Chief Minister Uddhav Thackeray | मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मालाड मालवणी येथे इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या रहिवाशांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याची तसेच जखमींच्या उपचारांचा खर्च करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी जखमी रहिवाशांची कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. यावेळी पालकमंत्री आदित्य ठाकरे, पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, महापौर किशोरी पेडणेकर, जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर उपस्थित होते. बुधवारी रात्री या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्तांशी चर्चा केली तसेच मदत व बचाव कार्य काळजीपूर्वक पार पाडण्याचे निर्देश दिले. अग्निशमन दल, महानगरपालिकेची पथके, पोलीस हे रात्रीपासून बचाव कार्य करीत होते. मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेतील जखमींना तातडीने रुग्णालयात हलवून शासनाच्या खर्चाने उपचार करावेत, असे निर्देशही दिले.

............................

Web Title: Rs 5 lakh to the heirs of the deceased - Chief Minister Uddhav Thackeray