Join us
Daily Top 2Weekly Top 5

अपघाती मृत्यूबद्दल पुण्याच्या कुटुंबास साडेचार कोटी भरपाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 05:47 IST

एका खासगी कंपनीत परदेशात मोठ्या हुद्द्यावर नोकरी करणाऱ्या रवींद्र प्रभाकर कुलकर्णी या पुण्यातील रहिवाशाच्या १० वर्षांपूर्वी झालेल्या अपघाती मृत्यूबद्दल उच्च न्यायालयाने त्यांच्या कुटुंबास तब्बल ४.५६ कोटी रुपयांची भरपाई मंजूर केली आहे.

मुंबई : एका खासगी कंपनीत परदेशात मोठ्या हुद्द्यावर नोकरी करणाऱ्या रवींद्र प्रभाकर कुलकर्णी या पुण्यातील रहिवाशाच्या १० वर्षांपूर्वी झालेल्या अपघाती मृत्यूबद्दल उच्च न्यायालयाने त्यांच्या कुटुंबास तब्बल ४.५६ कोटी रुपयांची भरपाई मंजूर केली आहे.श्रीमंगल, सुरेख हौसिंग सोसायटी, एरंडवणे येथे राहणारे रवींद्र कुलकर्णी टाटा प्रिसिजन या कंपनीत सिंगापूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करत होते. दि. १७ जून २००८ रोजी दुपारी भाड्याच्या मोटारीने चेन्नईहून पुद्दुचेरीकडे जात असता समोरून भरधाव वेगाने आलेल्या दुसºया मोटारीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात रवींद्र, त्यांची पत्नी शैलजा व मुलगा अनिकेत यांच्यासह त्यांच्या मोटारीचा चालक ठार झाले होते.या अपघाताबद्दल रवींद्र यांचा दुसरा मुलगा आशिश, वडील प्रभाकर आणि आई विजया यांनी मिळून पुण्याच्या मोेटार अपघात भरपाई न्यायाधिकरणात दावा दाखल केला. तेथे त्यांना २.५० कोटी रुपयांची भरपाई दावा दाखल केल्याच्या तारखेपासून ६ टक्के व्याजासह मंजूर झाली. समोरून ठोकर मारणाºया मोटारीचा विमा ज्यांनी उतरविला होता त्या न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनीने ही भरपाई द्यायची होती.याविरुद्ध कुलकर्णी कुटुंबिय व विमा कंपनी अशी दोघांनीही उच्च न्यायालयात अपिले केली होती. त्यात कुटुंबियांनी भरपाईची जमा रक्कम काढून घेण्याच्या व विमा कंपनीने न्यायाधिकरणाच्या निकालास स्थगितीच्या अंतरिम आदेशासाठी अर्ज केले होते. परंतु प्रभाकर व विजया यांनी वयाची सत्तरी ओलांडली आहे हे लक्षात घेऊन न्या. राजेंद्र सावंत व न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठाने अंतरिम अर्जांऐवजी अपिलेच तातडीने अंतिम सुनावणीसाठी घेतली. विमा कंपनीचे अपील फेटाळत व कुलकर्णी कुटुंबियांचे अपील मंजूर करत खंडपीठाने भरपाईची रक्कम २.५० कोटीऐवजी ४.५६ कोटी अशी वाढविली. शिवाय त्यावर द्यायच्या व्याजाचा दरही सहाऐवजी ७.५ टक्के केला. अश प्रकारे कुलकर्णी कुटुंबास मूळ भरपाई व व्याज मिळून सुमारे नऊ कोटी रुपयांची रक्कम मिळेल.या अपिलांच्या सुनावणीत विमा कंपनीसाठी अ‍ॅड. केतन जोशी यांनी तर कुलकर्णी कुटुंबियांसाठी अ‍ॅड. विश्वनाथ टाळकुटे यांनी काम पाहिले.>भावी उत्पन्नाचाही हिशेब देणाररवींद्र कुलकर्णी त्या कंपनीचे कायम कर्मचारी नव्हते, असा निष्कर्ष काढून न्यायाधिकरणाने भरपाईचा हिशेब करताना त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबाचे बुडालेले संभाव्य भावी उत्पन्न गृहित धरले नव्हते. मात्र खास करून विदेशात एवढ्या मोठ्या हुद्द्यावर काम करणाºया व्यक्तीच्या बाबतीत कायम वा हंगामी नोकरी या संकल्पना गैरलागू ठरतात, असे म्हणून उच्च न्यायालयाने बुडालेल्या संभाव्य उत्पन्नापोटी १२ लाख रुपयांची रक्कम भरपाईत धरली.