मेट्रोच्या सुरक्षेवर वर्षाकाठी २८ कोटी रुपयांचा खर्च

By Admin | Updated: May 31, 2015 00:42 IST2015-05-31T00:42:11+5:302015-05-31T00:42:11+5:30

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो मार्गावर धावणाऱ्या मेट्रोच्या रेल्वेच्या सुरक्षेवर मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाकडून वर्षाकाठी २८.१४ कोटी रुपये खर्च होत असल्याची माहिती उजेडात आली आहे.

Rs. 28 crores expenditure on metro security annually | मेट्रोच्या सुरक्षेवर वर्षाकाठी २८ कोटी रुपयांचा खर्च

मेट्रोच्या सुरक्षेवर वर्षाकाठी २८ कोटी रुपयांचा खर्च

मुंबई : वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो मार्गावर धावणाऱ्या मेट्रोच्या रेल्वेच्या सुरक्षेवर मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाकडून वर्षाकाठी २८.१४ कोटी रुपये खर्च होत असल्याची माहिती उजेडात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडवर मेहरबानी दाखवीत प्राधिकरण आजही या खर्चाचा भार उचलत आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकारांतर्गत ही माहिती प्राप्त केली आहे. कार्यकर्त्याने एमएमआरडीएकडे मेट्रो सुरक्षेवर होणाऱ्या खर्चाची माहिती मागितली होती. प्राधिकरणाने त्यांना दिलेल्या माहितीनुसार, एकूण वार्षिक सुरक्षा करार खर्च २१.७७ कोटी आणि स्नीफर डॉग्सवरील आतापर्यंतचा खर्च २८.८० लाख एवढा आहे. ही सर्व रक्कम एकत्र केली तर तो आकडा २८ कोटी १३ लाख ८० हजारांवर जातो. प्राधिकरणाने आतापर्यंत एप्रिल २०१४ ते जानेवारी २०१५ या दहा महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाला ८ कोटी ६९ लाख ६६ हजार ६४ रुपये एवढी रक्कम अदा केली आहे. आणि मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडला दरमहा ३.२० लाख या प्रमाणे ३२ लाख अदा करण्यात आले आहेत.

च्२२ आॅक्टोबर २०१० रोजी मुख्य सचिव आणि मुंबई पोलीस यांच्या झालेल्या बैठकीदरम्यान मेट्रोला सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. एमएमआरडीएने यासंदर्भातील निर्णय घेतला होता.
च्सर्वात महत्त्वाचे म्हणजे मेट्रोच्या सुरक्षेवर एवढे पैसे खर्च करूनही मुंबई मेट्रो वन ही कंपनी प्राधिकरणाला जुमानत नसल्याचे चित्र आहे. शिवाय मेट्रो प्रकल्प हा खासगी संपत्ती असल्याच्या आविर्भावात कंपनी आहे.
च्परिणामी मेट्रोच्या सुरक्षेवरील खर्च मुंबई मेट्रो वनकडूनच वसूल करण्यात यावा, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्त्याने केली आहे.

मुंबई मेट्रोच्या सुरक्षेवर करण्यात येणारा खर्च मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडकडून वसूल करण्यात यावा, या मागणीसाठी माहिती अधिकार कार्यकर्त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्य सचिव आणि एमएमआरडीए आयुक्तांना निवेदन धाडले आहे. शिवाय भविष्यात सुरक्षेची जबाबदारी एमएमआरडीएने घेण्याऐवजी ती नफा कमविणाऱ्या मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट कंपनीवर सोपवावी, असे म्हटले आहे.

मुंबई मेट्रो वन काय म्हणते? : मेट्रो आणि प्रवासी यांच्या सुरक्षेबाबत राज्य सरकारने दिलेल्या निर्णयांचे पालन केले जात असून, सुरक्षेवरील खर्च एमएमआरडीए करत आहे. राहिला भाग आॅपरेशन आणि मेन्टेनन्सचा तर हा भार कंपनीने उचलला आहे.

Web Title: Rs. 28 crores expenditure on metro security annually

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.