वीज बिल माफीसाठी आज ‘आरपीआय’चे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 04:17 IST2020-11-26T04:17:45+5:302020-11-26T04:17:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : लॉकडाऊनच्या काळात आलेल्या वीज बिलाची रक्कम ५० टक्के माफ करावी, वीज तोडणी करू नये, ...

वीज बिल माफीसाठी आज ‘आरपीआय’चे आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात आलेल्या वीज बिलाची रक्कम ५० टक्के माफ करावी, वीज तोडणी करू नये, वीज बिल भरणा करण्यासाठी मासिक हफ्त्यांची सवलत द्यावी, अशा विविध मागण्यांसाठी बुधवारी, २५ नोव्हेंबरला वांद्रे पूर्वेतील मुंबई उपनगर जिल्हा अधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आंदोलन होईल. तर, राज्यभरात स्थानिक पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करतील.