गोवंश हत्याबंदी विरोधात रिपाइंचे आंदोलन
By Admin | Updated: May 20, 2015 02:15 IST2015-05-20T02:15:15+5:302015-05-20T02:15:15+5:30
राज्यात गोहत्याबंदी कायदा लागू असताना गोवंश हत्याबंदी लागू करण्याची काहीही गरज नव्हती. हा नवा कायदा गोरगरीब आणि शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे.

गोवंश हत्याबंदी विरोधात रिपाइंचे आंदोलन
मुंबई : राज्यात गोहत्याबंदी कायदा लागू असताना गोवंश हत्याबंदी लागू करण्याची काहीही गरज नव्हती. हा नवा कायदा गोरगरीब आणि शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे थेट राष्ट्रपतींनाच भेटून हा कायदा रद्द करण्याची मागणी करणार असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खा. रामदास आठवले यांनी दिली. शिवाय या कायद्याविरोधात जेलभरो आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.
युती सरकारच्या गोवंश हत्याबंदी कायद्याविरोधात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रिपाइंने आज वांद्रे येथील म्हाडा कार्यालय ते मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले होते. त्या वेळी आठवले बोलत होते. गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे गरीब नागरिक, शेतकरी व चर्मोद्योग व्यवसायातील नागरिकांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे फडणवीस सरकारने हा कायदा रद्द करून पूर्वीचा गोहत्या बंदी कायदा लागू करावा, अशी मागणी आठवले यांनी केली. रिपाइं पक्ष राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारसोबत असला तरी सरकारच्या अन्यायकारक कायद्यांविरोधात स्वस्थ बसणार
नाही. (प्रतिनिधी)