Join us

मालाड तलाठी कार्यालयावर रिपाईचा मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 21:43 IST

यावेळी आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.

श्रीकांत जाधव मुंबईभिवंडी येथील संकेत भोसले हत्याकांडाच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे मालाड तालुका तर्फे मालवणी सजा तलाठी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.

रिपाई मालाड तालुका अध्यक्ष सुनील गमरे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी तलाठी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी रिपाईच्या वतीने मालवणी सजा तलाठी व मालवणी पोलीस ठाणे यांना निवेदन देण्यात आले. तसेच यावेळी तलाठी कार्यालय बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे संतप्त आंदोलनकर्त्यांनी पोलिसांना न जुमानता तलाठी कार्यालयासमोरील मार्वे रोडवर रास्ता रोको आंदोलन केले.

दरम्यान, पोलिसांच्या मध्यस्थीमुळे तहसीलदार कार्यालय बोरिवली येथील शासन प्रतिनिधींनी मालाड कार्यलयात धाव घेत आंदोलकांची माफी मागुन निवेदन स्वीकारले.

टॅग्स :मुंबई