कमळाच्या प्रचारात आरपीआयचा फौजफाटा

By Admin | Updated: October 2, 2014 22:48 IST2014-10-02T22:48:03+5:302014-10-02T22:48:03+5:30

आरपीआयने भाजपासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे, त्याचबरोबर प्रशांत ठाकूर हेही भाजपवासीय झाले आहेत.

RPI Legislation in Lotus Campaign | कमळाच्या प्रचारात आरपीआयचा फौजफाटा

कमळाच्या प्रचारात आरपीआयचा फौजफाटा

>पनवेल : आरपीआयने भाजपासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे, त्याचबरोबर प्रशांत ठाकूर हेही भाजपवासीय झाले आहेत. या बदलत्या समीकरणामुळे मधल्या काळात काहीसे दुरावले गेलेले माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि जगदीश गायकवाड या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आले आहेत. त्याचा परिणाम म्हणजे पनवेलमध्ये भाजपाच्या प्रचारात आरपीआयची फौज लवाजम्यासह उतरली आहे.
2क्क्6 साली काँग्रेस-राष्ट्रवादी व आरपीआय हे पनवेल नगरपालिकेची निवडणूक एकत्रितरीत्या लढले होते. यावेळी आघाडीचा झेंडा पालिकेवर फडकला. जगदीश गायकवाड हे काँग्रेस आणि पर्यायाने ठाकूर यांच्यापासून दुरावले गेले.
2क्क्9 साली लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याने रामदास आठवले यांनी आघाडीशी काडीमोड घेत युतीबरोबर जाणो पसंत केले. त्यामुळे रायगड आणि विशेषत: पनवेलमध्ये गायकवाड यांनीही युतीशी हातमिळवणी केली. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेकापही बरोबर होता. या व्यतिरिक्त राष्ट्रवादीचाही आतून हात होता. एकंदरीतच सर्व पक्ष हे काँग्रेस विरोधात होते, मात्र ठाकूर यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपाचे कमळ हातात घेतले. त्यांच्याकरिता राज्यात इतर ठिकाणी जागा सोडण्यात आल्या आहेत. या बदल्यात ज्या ज्या ठिकाणी भाजपाचे उमेदवार आहेत, तिथे प्रचार करण्याचे आदेश आठवले यांनी राज्यातील पदाधिका:यांना दिले आहेत. त्यानुसार रायगड जिल्हय़ातील सर्व मतदारसंघात भाजपाला मदत करण्याकरिता आरपीआय सरसावली आहे. 
जगदीश गायकवाड यांच्या पत्नी कविता गायकवाड या शेतकरी कामगार पक्षाच्या चिन्हावर जिल्हा परिषदेवर निवडून गेल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर आरपीआयचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रचारात उतरले आहेत. (वार्ताहर)
 
भीमशक्ती कमळाकरिता जमेची बाजू
4पनवेल परिसरात मोठय़ा प्रमाणात आंबेडकरी जनता राहत असून त्यांची आंबेडकर भवनाची मागणी प्रशांत ठाकूर यांनी पुढाकार घेवून पूर्ण केली आहे. आंबेडकरी चळवळीची विशेष रुची असलेल्या ठाकूर यांनी पनवेलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रंचे प्रदर्शन भरवले होते. आंबेडकरी विचारांचा पुरस्कर्ता म्हणून त्यांचा नावलौकिक झाला आहे. त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत होईलच, त्याचबरोबर आरपीआय बरोबर असल्याने भीमाचे सैनिक कमळाला पसंती देणार आहेत.  

Web Title: RPI Legislation in Lotus Campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.