आरपीएफ जवानाने वाचवले गर्भवती महिलेसह मुलाचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:09 IST2021-05-05T04:09:25+5:302021-05-05T04:09:25+5:30

लोकमत न्युज नेटवर्क मुंबई : दादर रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म ५ वर रविवारी सीएसएमटी-दानापूर स्पेशल ही गाडी धावत जाऊन ...

RPF trooper rescues child with pregnant woman | आरपीएफ जवानाने वाचवले गर्भवती महिलेसह मुलाचे प्राण

आरपीएफ जवानाने वाचवले गर्भवती महिलेसह मुलाचे प्राण

लोकमत न्युज नेटवर्क

मुंबई : दादर रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म ५ वर रविवारी सीएसएमटी-दानापूर स्पेशल ही गाडी धावत जाऊन पकडताना गर्भवती महिला तिच्या मुलासह ताेल जाऊन खाली पडली. त्याचवेळी तेथे हजर असलेले आरपीएफ जवान अशोक यादव यांनी प्रसंगावधान राखत धावत जाऊन दाेघांनाही गाडीखाली जाण्यापासून वाचवले.

शोभा कुमारी असे या महिलेचे नाव आहे. रविवारी ती दादरवरून गाडी पकडून दानापूरला जाणार होती. मात्र, रेल्वे स्थानकावर पाेहाेचायला तिला उशीर झाला. गाडी सुरू झाल्याने धावत जाऊन तिने गाडी पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिचा तोल गेला. त्यामुळे ती मुलासह खाली पडली. अशोक यादव यांनी प्रसंगावधान दाखवत दोघांनाही रेल्वे खाली जाण्यापासून वाचवले. याबाबत यादव यांचे कौतुक करण्यात येत असून त्यांना लवकरच रेल्वे प्रशासनाकडून सन्मानित केले जाणार असल्याचे समजते.

दरम्यान, प्रवाशांनी चालू गाडीत चढू अथवा उतरू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

.................................

Web Title: RPF trooper rescues child with pregnant woman