Join us  

आरपीएफच्या खांद्यावर आता बॉडी वॉर्न कॅमेरे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 5:10 AM

रेल्वे मार्गावरील सुरक्षा व्यवस्थेत आणखी वाढ होईल

मुंबई : प्रत्येक घटनेची माहिती रेकॉर्ड करण्यासाठी, रेल्वे परिसरातील हालचालींवर नजर ठेवण्यासाठी आरपीएफच्या खांद्यावर बॉडी वॉर्न कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे रेल्वे मार्गावरील सुरक्षा व्यवस्थेत आणखी वाढ होईल.रेल्वे परिसरात प्रवाशांना जास्तीत जास्त सुरक्षा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रशासन प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवरच हे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या कॅमेऱ्याची क्षमता १० मेगापिक्सल इतकी असून त्यात ३२ जीबीपर्यंत डाटा साठवता येईल. रात्रीच्या वेळी नाइट व्हिजन कॅमेरा सुरू करता येईल. आरपीएफ जवानांच्या खांद्यावर हे कॅमेरे लावल्याने नजीकच्या परिसरासह दूरवरचे छायाचित्रणही टिपण्यास मदत होईल, अशी माहिती आरपीएफकडून देण्यात आली.

टॅग्स :रेल्वे