आरपीएफ जवानाला प्रेयसी, पत्नीकडून चोप
By Admin | Updated: April 19, 2015 00:36 IST2015-04-19T00:36:07+5:302015-04-19T00:36:07+5:30
होमगार्ड म्हणून रेल्वे सेवेत रुजू झालेल्या विवाहितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) जवानाने तिच्याच तीन वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे केले.

आरपीएफ जवानाला प्रेयसी, पत्नीकडून चोप
मुंबई : होमगार्ड म्हणून रेल्वे सेवेत रुजू झालेल्या विवाहितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) जवानाने तिच्याच तीन वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे केले. मात्र याबाबत तक्रार करूनही मुंबई, ठाणे पोलीस, रेल्वे पोलीस किंवा आरपीएफने दखल न घेतल्याने या संतापलेल्या या जवानाच्या पत्नीसह पीडित मुलीचे कुटुंबीय आणि रेल्वे प्रवाशांनी शनिवारी त्याची मुलुंड रेल्वे स्थानकातच धुलाई केली.
गौतम मेश्राम असे या जवानाचे नाव आहे. त्याने या विवाहितेला प्रेमाच्या जाळ््यात ओढल्यानंतर दोघांमध्ये शरीरसंबंध निर्माण झाले. दरम्यानच्या काळात विवाहितेला मुलगी झाली. गौतम विवाहितेला भेटण्यासाठी तिच्या घरी जाई. ही बाब तिच्या पतीला समजताच दोघांमध्ये खटके उडायला सुरुवात झाली.
वर्षभरापूर्वी त्या विवाहित प्रेयसीने मुलीसह घर सोडले. सहा महिने ती वडिलांसोबत राहली. पतीने समजूत काढून तिला पुन्हा घरी नेले. मात्र गौतमच्या प्रेमात आंधळ््या झालेल्या विवाहितेने पुन्हा घर सोडले आणि ती दिव्याला राहू लागली. दरम्यान, १४ एप्रिलला वडिलांकडे गेलेल्या मुलीने पोटात दुखत असल्याचे सांगितले. अधिक चौकशीत तिने गौतमने अत्याचार केल्याचे सांगितले. त्यानुसार या दाम्पत्याने गौतमविरोधात तक्रार देण्यासाठी शुक्रवारी पार्क साइट पोलीस ठाणे गाठले. मात्र पार्क साइट पोलिसांनी त्यांना मुंब्रा पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार या दाम्पत्याने मुंब्रा ठाणे गाठले तेथेही पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार देत पुन्हा पार्क साइट पोलीस ठाण्यात धाडले.
अखेर पार्क साइट पोलिसांनी चिमुरडीला वैद्यकीय चाचण्यांसाठी राजावाडी रुग्णालयात नेले. मात्र वैद्यकीय अहवालात अत्याचार झाल्याचे स्पष्ट होत नसल्याने गुन्हा दाखल केला नसल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक सुरेश सकपाळ यांनी दिली. प्रेयसीच्या पतीने गौतमच्या पत्नीशी संपर्क साधून त्याने आपल्या तीन वर्षांच्या मुलीवरील अत्याचाराची माहिती दिली. शनिवारी मुलुंड स्थानकात गौतम कामावर असताना त्याच्या पत्नीसह प्रेयसीने त्याला चोप देत त्याला पोलिसांच्या हवाली केले.