रत्नागिरी तालुक्यातील खालगाव येथील विद्यार्थी रोशन मुळ्ये बेपत्ता

By Admin | Updated: September 15, 2014 23:24 IST2014-09-15T21:58:52+5:302014-09-15T23:24:36+5:30

शोध सुरू : पोलिसांकडून जाबजबाबाचे काम सुरू

Roshan Mulaiya, missing from Khalgaon, Ratnagiri taluka | रत्नागिरी तालुक्यातील खालगाव येथील विद्यार्थी रोशन मुळ्ये बेपत्ता

रत्नागिरी तालुक्यातील खालगाव येथील विद्यार्थी रोशन मुळ्ये बेपत्ता

खालगाव : रत्नागिरी तालुक्यातील खालगाव येथील रहिवासी व जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालयात इयत्ता नववीत शिकत असलेला रोशन मिलिंद मुळ्ये (१४) हा विद्यार्थी दि. १३ सप्टेंबर रोजी दुपारनंतर बेपत्ता झाला आहे.
याबाबत वृत्त असे की, खालगावातील शेतकरी मिलिंद नरहरी मुळ्ये यांचा मुलगा रोशन हा मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालयात नववीत शिकत आहे. शनिवार, १३ रोजी सकाळी ७ वाजता शाळेसाठी तो घरातून निघाला. ११.२० वाजल्यानंतर शाळा सुटली. सर्व मुले आपापल्या घरी निघून गेली. रोशनही आपल्या घराच्या वाटेने निघाला. तो एकटाच खालगावच्या दिशेने चालत गेल्याचे काही ग्रामस्थांनी पाहिले. मात्र, तो घरी न जाता रस्त्यातून तो परत जाकादेवी एस. टी. स्टॅण्डकडे गेल्याचे काही गावकऱ्यांनी पाहिले. मात्र, तो सायंकाळी घरी पोहोचला नाही. रोशन घरी आला नाही म्हणून वडील मिलिंद मुळ्ये, चुलते चंद्रकांत मुळ्ये व घरातील माणसांनी शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापकांकडे चौकशी केली असता तो हायस्कूलमधून घरी निघून गेल्याचे सांगितले. तरीही शाळेचा परिसर आणि बाजारपेठेत त्याचा पुन्हा शोध घेतला.
निळ्या रंगाची फुल पॅण्ट, पांढरा शर्ट, चेहरा गोल, अंगाने सडपातळ, सावळा रंग, बारीक केस, काळ्या रंगाची सॅक (दप्तर), सोबत एस. टी. पास, ओळखपत्रासह तो बेपत्ता आहे. तो नेमका कोठे गेला, हे अद्याप समजू शकले नाही. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नाना मयेकर, उपाध्यक्ष डॉ. सुभाष आखाडे, मुख्याध्यापक किशोर पाटील यांनी कुटुंबीयांना धीर देऊन तो सुरक्षित घरी परतेल, असा दिलासा दिला. रोशनचा अधिक तपास गतिमान सुरु असून, ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्ताराम भांड्ये अधिक तपास करीत आहेत. मुळ््ये शाळेतून पुन्हा घरी गेला नसल्याने पुढे काय झाले याबाबत तपास सुरू आहे.(वार्ताहर)

नववीतील विद्यार्थी बेपत्ता झाल्याने परिसरात चिंता.
जाकादेवी येथील मुळ्ये माध्यमिक विद्यालयातील प्रकार.
खालगावच्या दिशेने चालत गेल्याचे काहिंनी पाहिले.
संचालक देत आहेत कुटुंबाला धीर.
शोधमोहीम सुरूच.
सारे कुटुंबीय अद्याप चिंतेत.
विद्यार्थी बेपत्ता झाल्यानंतर खळबळ.
शाळेतून घरी परतत असताना तो नक्की गेला कुठे हा प्रश्न पालक व पोलिसांना पडलाय.

Web Title: Roshan Mulaiya, missing from Khalgaon, Ratnagiri taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.