‘रोझ डे’चा गुलाबी माहोल
By Admin | Updated: February 7, 2015 22:53 IST2015-02-07T22:53:10+5:302015-02-07T22:53:10+5:30
प्रेम म्हणजे प्रेम असतं...तुमचं आमचं सेम असतं. प्रेमाच्या व्याख्या जरी वेगवेगळ््या असल्या तरी दोघांमधले प्रेम व्यक्त करण्याची भावना मात्र एकच असते.

‘रोझ डे’चा गुलाबी माहोल
प्रेम म्हणजे प्रेम असतं...तुमचं आमचं सेम असतं. प्रेमाच्या व्याख्या जरी वेगवेगळ््या असल्या तरी दोघांमधले प्रेम व्यक्त करण्याची भावना मात्र एकच असते. गोड गुलाबी या प्रेमाचा आनंद लुटण्यासाठी यंगस्टर्स दरवर्षी तेवढ्यात उत्साहाने या वीकची वाट पाहत असतात. अशा या व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात आज रोझ डेने झाली. आजचा पहिला दिवस म्हणजे रोमँटिक. असा रोझ डे तेवढ्याच गुलाबी ढंगात तरूणाईने साजरा केला.
हल्लीच्या तरुणाईची क्रेझ असलेला हा रोझ डे जगभरात वेगवेगळ्या पध्दतीने साजरा केला जातो. आपले फीलिंग्स समोरच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी रोझ डे मोठ्या उत्साहात सेलिब्रेट केला जातो. वेगवेगळ्या देशांमध्ये हा रोझ डे वेगवेगळ््या पध्दतीने साजरा केला जातो. चीनमधले तरुण आपल्या प्रेयसीला फुलांची भेट देऊन हा रोझ डे साजरा करतात. जपानमध्ये तर नवलच...तिथे हार्ट शेप चॉकलेट्सचा मार्केटमध्ये सेल लागतो आणि प्रियकर व प्रेयसी दोघेही एकमेकांना चॉकलेट देऊन प्रेमाची गोड सुरुवात करतात. लॅटीन अमेरीकामध्ये लव्हमेट्स एकमेकांना फुलांचे गुच्छ, गिफ्ट्स, कार्ड्स आणि चॉकलेट्स देतात. सिंगापूरमधले प्रेमी तर खूपच हौशी असतात आणि आपल्या प्रियकर-प्रेयसीला इंम्प्रेस करण्यासाठी ही मंडळी वाटेल तितका खर्च करतात. त्यासाठी मोठी पार्टी ठेवतात. आयुष्यातले हे प्रेमाचे क्षण जपण्यासाठी हॉलिडेजचा प्लॅन आखतात. फिलीपिन्समधले बाजार रोझेसने सजलेले पाहायला मिळतात. यात रेड रोझेसला मोठ्या प्रमाणात मागणी असून जिकडे तिकडे गुलाबी वातावरण अनुभवायला मिळते.
आता राहिला तो आपला भारत देश...खरंतर १९९२ पर्यंत व्हॅलेंटाईन वीक काय असतो आणि कसा साजरा करतात याची कल्पनाच भारतात पोहोचली नव्हती. त्यामुळे भारतीयांना याची फारशी माहितीच नव्हती. जेव्हा भारताने व्हॅलेंटाईन वीक सेलिब्रेट करायला सुरुवात केली, तेव्हा मात्र ती इतर देशातील प्रेमिकांना लाजवेल अशी....फुल टु रोमॅन्टीक अशीच होती. भारतात साजरा होणारा व्हॅलेंटाईन वीक हे जणू लव्हर्स फेस्टिवलच आहे. इथे रोझ डे सुरु झाला म्हणजे व्हॅलेंटाईनचे काऊंटडाऊन सुरु होते. अगदी पहिल्याच दिवसापासून तरुणाईचे प्रेम हे गुलाबासारखे बहरुन येते. या रोझ डे सेलिब्रेशनमध्येही आता नव्याने बदल झाला असून त्यात एकमेकांना कोणत्या रंगाचे गुलाब भेट केले यावरुन दोघांमधील नाते लक्षात आणून दिले जाते.
कॉलेजचा कँम्पसही फुल्ल
कॉलेजच्या कॅलेंडरमध्येही रोझ डेला यावेळी प्राधान्य दिले गेले होते. कॉलेजमध्ये २-३ दिवसांपूर्वीच विद्यार्थी तयारीला लागले होते. कॅम्पसमध्ये रोझकार्ड उपलब्ध करुन दिली गेली. या रोझकार्डवर आपले नाव न लिहिता आपल्याला ज्या मुला-मुलीला रोझकार्ड आणि रोझ द्यायचे आहे, त्याचे नाव लिहून ते ड्रॉप बॉक्समध्ये जमा केले गेले. रोझ डेच्या दिवशी प्रत्येक वर्गाच्या क्लास टीचर हा बॉक्स ओपन करुन नावाप्रमाणे रोझकाडर््स वाटत असून यावेळी असेच काहीसे झाले. कार्ड्स वाटून झाल्यावर ज्या मुलीला सर्वात जास्त रोझकार्ड्स आणि रोझेस मिळाले. तिला रोझक्वीन बनविले गेले. एवढ्यावरच हा रोझ डे संपला नाही तर सगळे वर्ग मिळून जास्तीत जास्त रोझ मिळवणाऱ्या मुलीला कॉलेजची रोझक्वीन हे टायटल दिले.
सेलिब्रेशन आलेच
रोझ डे हा फक्त आता कॉलेजपुरता मर्यादित राहिला नाही. आजच्या दिवशी तर मॉल्स, क्लब, हॉटेल्समध्येही रोमँटीक पध्दतीने साजरा केला जातो. रोझ डे हा फक्त प्रेम व्यक्त करण्याचा दिवस नाही तर आपल्या पार्टनरसोबत वेळ घालवून एका मस्त ठिकाणी सेलिब्रेशन करण्याची क्रेझ वाढत असलेलीच दिसून येत आहे. म्हणतात ना प्रेम करण्याला काही वय नसते...मग बाकी मंडळी या रोझ डे सेलिब्रेशनमध्ये कशी मागे पडतील. नुकतेच लग्न झालेली जोडपी आणि लग्नाला बरीच बर्षे उलटून गेली तरी प्रेमात कसलीही कसर न सोडणाऱ्यांचा उत्साह तितकाच दांडगा होता. दिवसभर कामानिमित्त एकमेकांपासून दूर राहणाऱ्या जोडप्यांसाठी हॉटेल्स आणि मॉल्समध्ये वेगवेगळे पॅकेज उपलब्ध करुन देण्यात आली.