छप्पर दुरुस्तीचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 02:32 AM2019-06-15T02:32:45+5:302019-06-15T02:33:12+5:30

आरेच्या पालिका शाळेतील स्थिती : पाच वर्षांपूर्वी बदलले होते पत्रे

Rooftop repair work | छप्पर दुरुस्तीचे काम सुरू

छप्पर दुरुस्तीचे काम सुरू

Next

मनोहर कुंभेजकर 

मुंबई : गोरेगाव पूर्व आरे येथील युनिट क्रमांक १६, आरे डेअरीजवळ महापालिकेची शाळा असून, येथे विविध भाषिक २ हजार विद्यार्थी शिकतात. सोमवारी पडलेल्या पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण उडली असताना या शाळेचे लोखंडी पत्रे उडाले. सुदैवाने येथे जीवितहानी झाली नाही. येथे युनिट क्रमांक १६ मध्ये एकूण ६ शाळा असून, तामिळ विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. तामिळच्या दोन शाळा, मराठी विभागाच्या दोन शाळा, एक हिंदी व एक माध्यमिक विभाग अशा शाळा आहेत.

आज, १५ जूनपासून नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार असून, पुन्हा या शाळेचे पत्रे पी दक्षिण वॉर्डच्या मेंटेनन्स विभागाकडून बसविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे उडालेले पत्रे वेळेत बसविले जातील का? शाळा वेळेवर सुरू होणार का? पुन्हा पत्रे उडून कोणतीही हानी होणार नाही, याची खबरदारी पालिका शिक्षण विभागाचे संबंधित अधिकारी घेणार का? असा सवाल येथील पालकांनी केला. जर शाळा सुरू असताना पत्रे उडाले असते, तर मोठी हानी झाली असती, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
शालेय व्यवस्थापन समिती सदस्य आनंदराय मोघा यांनी सांगितले की, पूर्वी या शाळेचे मजबूत पत्रे होते. मात्र, शाळेच्या दुरुस्तीच्या नावाखाली ५ वर्षांपूर्वी पत्रे बदलण्यात आले. सुमारे ३ कोटी ४२ लाख रुपये या शाळेच्या दुरुस्तीवर खर्च करण्यात आले.
या प्रकरणी पी दक्षिण विभागाच्या शिक्षण विभागाच्या सहायक प्रशासकीय अधिकारी निशा यादव यांनी सांगितले की, सोमवारच्या वादळी पावसात मराठी शाळेचे दोन वर्ग, लायब्ररी, तसेच मराठी व तामिळ शाळेच्या मधल्या पॅसेजचे पत्रे उडाले होते. याची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन, वॉर्डचे एई मेटेनन्स खाते गेले ४ दिवस पत्रे बसविण्याचे काम करत आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी बाधित वर्गावर पत्रे लावले गेले असून, मधल्या पॅसेजचे पत्रे नंतर लावले जातील, अशी माहिती त्यांनी दिली. वर्गांचे बसविलेले पत्रे परत उडू नयेत, म्हणून त्यांच्या मजबुतीकरणाचे काम येत्या दोन-तीन दिवसांत पूर्ण होणार आहे.

रस्ताही नव्हता
च्डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या शाळेला बिबटे व सापांचा धोका आहे. ५ वर्षांपूर्वी शाळा सुटल्यावर शाळेच्या मागच्या प्रवेशद्वारावर बिबट्याच्या हल्ल्यात इयत्ता सातवीमधील विद्यार्थी प्रकाश साळुंखे हा दगावला होता.
च्या शाळेकडे जाणारा रस्ता नव्हता. क्रिकेटर व माजी राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकर यांच्या खासदार निधीतून रस्ता बनविला होता.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Rooftop repair work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app
टॅग्स :Mumbaiमुंबई