धावत्या लोकलवर दगडफेक
By Admin | Updated: August 4, 2015 01:11 IST2015-08-04T01:11:09+5:302015-08-04T01:11:09+5:30
चोराचा पाठलाग करताना एका युवतीला प्राण गमवावा लागल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी संध्याकाळी कळवा-मुंब्रा डाऊन फास्ट लोकलवर

धावत्या लोकलवर दगडफेक
डोंबिवली : चोराचा पाठलाग करताना एका युवतीला प्राण गमवावा लागल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी संध्याकाळी कळवा-मुंब्रा डाऊन फास्ट लोकलवर एका अज्ञाताने भिरकावलेल्या दगडाने दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी अज्ञातावर ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला.
अमन धर्मराज कोहरी (रा. टिटवाळा) आणि राहुल चौधरी (रा. डोंबिवली) असे त्या दोघा जखमींची नावे असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली. ही घटना सोमवारी संध्याकाळी ७.४०च्या सुमारास घडली. त्याची माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली, मात्र काहीही माहिती मिळाली नसल्याने अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.