एस्सेलवर्ल्डमध्ये रंगला 'रॉक बँड'चा थरार

By Admin | Updated: September 26, 2016 18:05 IST2016-09-26T18:05:01+5:302016-09-26T18:05:01+5:30

Across Seconds, Eternal Returns, Tripp Pilots या ३ टीम्समधध्ये मुख्य लढाई होती. अतिशय चुरशीच्या या रॉक बँड इंवेटमध्ये Across Seconds ने बाजी मारली.

The 'rock band' thriller in Color in Esselworld | एस्सेलवर्ल्डमध्ये रंगला 'रॉक बँड'चा थरार

एस्सेलवर्ल्डमध्ये रंगला 'रॉक बँड'चा थरार

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ : शनिवारी एस्सेलवर्ल्ड आणि वॉटरकिंग्डममध्ये रॉक बँडचा कार्यक्रम रंगला. एस्सेलवर्ल्डने आयोजित केलेल्या या रॉक बँडचा थरार अनेकांना अनुभवायला मिळाला. रॉक बँडच्या चाहत्यांसाठी तर ही पर्वणीच ठरली. संगीत प्रेमींमध्ये फार उत्सुकता पहायला मिलाली. एस्सेलवर्ल्डने आयोजन केलेल्या या रॉक बँड स्पर्धेमध्ये देशभरातून 50 हून अधिक रॉक बँड टीम्सने प्रवेश नोंदवला होता. त्यामधून ३ रॉक बँड टीम्सला मुख्य इवेंटसाठी निवडण्यात आलं होतं. 
Across Seconds, Eternal Returns, Tripp Pilots या ३ टीम्समधध्ये मुख्य लढाई होती. अतिशय चुरशीच्या या रॉक बँड इंवेटमध्ये Across Seconds ने बाजी मारली. या स्पर्धेतील विजयी टीमला मुंबईत होणाऱ्या इंडिपेंडन्स रॉक 2016 (INDEPENDENCE ROCK 2016) या देशातील मोठ्या मंचावर वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळणार असून परफॉर्मेन्स करण्याची मोठी संधी मिळणार आहे. Across Seconds बँडला एस्सेलवर्ल्डच्या बीग नाईट २०१६ मध्येही परफॉर्मेन्स करायला मिळणार आहे.
 

 

Web Title: The 'rock band' thriller in Color in Esselworld