Join us  

आयआयटीत रंगणार  रोबोवॉर आणि ड्रोन रेस; २७ ते २९ दरम्यान टेकफेस्टचे आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 8:54 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पवईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत (आयआयटी) २७ ते २९ डिसेंबरदरम्यान टेकफेस्ट हा तंत्र महोत्सव ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पवईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत (आयआयटी) २७ ते २९ डिसेंबरदरम्यान टेकफेस्ट हा तंत्र महोत्सव रंगणार आहे. रोबोवॉर, ड्रोन रेस, एरोमॉडेलिंग या डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या तांत्रिक करामतींबरोबरच जगभरात विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी टेकफेस्टमध्ये दरवर्षी मिळते. हा आशियातील सर्वात मोठा तंत्र महोत्सव म्हणून ओळखला जातो.

इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांच्यासह माजी लष्करप्रमुख एम. एम. नरवणे, ॲडमिरल करंभीर सिंग, यूके स्पेस एजन्सीचे हर्षभीर संघा, रिलायन्स जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी, सीईआरएनचे वरिष्ठ विज्ञान संशोधक अल्बर्ट डी रॉक, माजी एअर चीफ मार्शल आर. के. एस. भादुरिया, यूएनईसीईच्या ओल्गा अल्गायेरोवा यांना ऐकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळेल. याशिवाय देशी-परदेशी कलाकारांच्या डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या करामती पाहता येतील. यात लेझर टॅग, फुटबॉल फ्रीस्टाईल, थायलंडचे फायर आर्टिस्ट, पोलंडचे डायबोलो जगलर, व्हीआर गेम्स, ऑल टेरीन व्हेईकल, होलोग्रामिक शो यांचा समावेश असेल. ब्राझील, रशिया, दक्षिण कोरियाचे प्रतिनिधी टेकफेस्टचे आकर्षण असणाऱ्या रोबोवॉरमध्ये सहभागी होतील.

प्रमुख आकर्षणरोबोटिक्स, एसओएफ इनोव्हेशन चॅलेंज, इंटरनॅशनल ड्रोन रेसिंग, मेश्मराईज्ड, इंटरनॅशनल फुल थ्रॉटल, अल्गो निन्जा, कॉझ्मो क्लेन्च, बोईंग एरोमॉडेलिंग स्पर्धाइंटरनॅशनल बिझनेस समिट विप्रोचे सीआयओ अनुप पुरोहित, एमएमसीचे जीआयसी लीडर पुष्परंजन मालाजुरे, सिमेन्सचे चीफ कस्टम्स ऑफिसर सतीश पांडे, रिलायन्सचे अशोक वसिष्ठइंटरनॅशनल फिनटेक समिट कोटक म्युच्युअल फंडचे एमडी नीलेश शहा, आरबीआयचे कार्यकारी संचालक पी. वसुदेवन, एनएसडीएलच्या एमडी पद्मजा चुंदुरू, अस्टॉक्सच्या संस्थापक कविता सुब्रह्मण्यम 

प्रदर्शनेरोबोटिक बर्ड (स्वीत्झर्लंड), प्रोटो होलोग्राम (अमेरिका), बोफोर्स ४० एमएम ऑटोमॅटिक गन एल-७० (भारत), मॅग्नेको (स्वीत्झर्लंड), क्लिअर बॉट (हाँगकाँग), ॲडव्हान्स वेपन ॲण्ड के ९ स्किल डिस्प्ले एनएसजी.

टॅग्स :आयआयटी मुंबई