बिबटय़ाच्या मागावर रोबोटिक कॅमेरा!
By Admin | Updated: July 25, 2014 02:51 IST2014-07-25T02:51:21+5:302014-07-25T02:51:21+5:30
पवई आयआयटीमध्ये शिरकाव केलेल्या बिबटय़ाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने जंगजंग पछाडले असले तरी अद्याप तो हाती लागलेला नाही.

बिबटय़ाच्या मागावर रोबोटिक कॅमेरा!
मुंबई : पवई आयआयटीमध्ये शिरकाव केलेल्या बिबटय़ाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने जंगजंग पछाडले असले तरी अद्याप तो हाती लागलेला नाही. मात्र आता त्या बिबटय़ाच्या हालचाली टिपण्यासाठी आयआयटीच्या विद्याथ्र्यानी बनविलेल्या रोबोटिक कॅमे:याची मदत घेतली जात आहे.
पवई आयआयटी परिसरात बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास बिबटय़ा शिरल्याची वार्ता वा:यासारखी पसरली आणि भल्याभल्यांना घाम फुटला. रात्री उशिरार्पयत बिबटय़ाबाबत अनेक तर्कवितर्क लढविण्यात आले. मात्र काही केल्या बिबटय़ा हाती लागेना. वनविभागाने घटनास्थळी पिंजरा बसविला. बिबटय़ासाठी भक्ष्य म्हणून कोंबडय़ा ठेवल्या. पण 24 तास उलटूनही बिबटय़ा जेरबंद झालेला नाही. आयआयटीमध्ये बिबटय़ाचा बछडा असण्याच्या शक्यतेने आणखी जोर धरला आहे. बिबटय़ाच्या हालचाली टिपण्यास रोबोटिक कॅमेरे सोडण्यात आले आहेत, असे आयआयटी विद्याथ्र्याचे म्हणणो आहे. (प्रतिनिधी)