आरटीओच्या कामाची वाजणार बोंब
By Admin | Updated: September 16, 2014 01:08 IST2014-09-16T01:08:43+5:302014-09-16T01:08:43+5:30
लोकसभा निवडणुकीच्या कामकाजात मुंबईतील आरटीओ अधिकारी आणि कर्मचा:यांना डय़ुटी लावण्यात आल्यामुळे कामाचा पुरता बो:या वाजला होता.

आरटीओच्या कामाची वाजणार बोंब
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या कामकाजात मुंबईतील आरटीओ अधिकारी आणि कर्मचा:यांना डय़ुटी लावण्यात आल्यामुळे कामाचा पुरता बो:या वाजला होता. असे असतानाच आता होणा:या विधानसभा निवडणुकीतील कामकाजासाठी आरटीओतील कर्मचा:यांचा समावेश केला जाणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आरटीओतील कामाची बोंब वाजणार आहे.
15 ऑक्टोबर रोजी होणा:या विधानसभा जय्यत तयारी केली जात आहे. या निवडणुकीच्या कामकाजासाठी सरकारी कर्मचा:यांचा समावेश केला जातो. लोकसभा निवडणुकीप्रमाणोच यंदाही सरकारी कर्मचा:यांचा मोठय़ा प्रमाणात समावेश केला जाणार आहे. यात आरटीओतील अधिकारी आणि कर्मचा:यांचाही समावेश असून त्यांच्या समावेशामुळे कामकाजाची ठप्प होणार आहे.
ताडदेव आरटीओतील 25 पेक्षा अधिक तर अंधेरी आरटीओतील 71 कर्मचा:यांना यात समाविष्ट केले जाणार आहे. याबाबतची निवडणूक आयोग कार्यालयाकडून मागणीही करण्यात आली आहे. तर वडाळा आरटीओकडे अद्याप याबाबत मागणी करण्यात आलेली नाही. मात्र दोन दिवसांत त्याबाबत मागणी करण्यात येईल, असे सूत्रंनी सांगितले.
त्यामुळे नवीन ड्रायव्हिंग लायसन्स देणो, नूतनीकरण करणो, दंड भरणो आदी कामे रखडणार आहेत. याबाबत ताडदेवचे आरटीओ अधिकारी के.टी.गोलानी यांनी सांगितले की, निवडणुकीच्या कामासाठी राज्यातील प्रत्येक सरकारी कर्मचारी देण्यात येतो. हा कामाचाच भाग आहे. मात्र आरटीओतील कर्मचारी काही प्रमाणात जाणार असल्याने कामावर थोडाफार परिणाम होईल.
त्याचप्रमाणो अंधेरी आरटीओ अधिकारी पी.जी. भालेराव यांनी सांगितले की, साधारण 2क्क् कर्मचारी आमच्याकडे कार्यरत आहेत. यातील 71 कर्मचारी मागण्यात आले आहेत. त्यामुळे थोडाफार परिणाम कामावर होणार आहे. याबाबत आम्ही निवडणूक आयोग कार्यालयाशी संपर्क साधून राहणार असून कर्मचारी आणखी काही प्रमाणात कमी देता येतात का ते पाहणार आहोत. (प्रतिनिधी)