डोंबिवलीत कॅश व्हॅनवर दरोडा
By Admin | Updated: October 21, 2015 03:17 IST2015-10-21T03:17:38+5:302015-10-21T03:17:38+5:30
डोंबिवली नजीकच्या कल्याण-शीळ मार्गावरील निळजे रेल्वे स्थानक परिसरात एका कॅश व्हॅनवर बंदुकीच्या धाकाने दरोडा घालून गाडीतील तब्बल ५६ लाखांची रोकड लंपास करण्यात

डोंबिवलीत कॅश व्हॅनवर दरोडा
कल्याण : डोंबिवली नजीकच्या कल्याण-शीळ मार्गावरील निळजे रेल्वे स्थानक परिसरात एका कॅश व्हॅनवर बंदुकीच्या धाकाने दरोडा घालून गाडीतील तब्बल ५६ लाखांची रोकड लंपास करण्यात आल्याची घटना मंगळवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास घडली. ही रोकड रेल्वे स्थानकांची होती. दरोडेखोर स्कॉर्पिओ गाडीतून आले होते. ही गाडी घटनेच्या १ तास आधीपासून घटनास्थळावर उभी होती. त्यामुळे नियोजनपुर्वक हा दरोडा असावा असा संशय व्यक्त होत आहे. लुटण्यात आलेली कॅश व्हॅन निळजे स्थानकातील रोकड घेऊन मुंबईच्या दिशेने निघणार होती. तत्पुर्वीच स्कॉर्पिओतील टोळक्याने बंदुकीच्या धाकाने कॅ श लुटत गाडीने पोबारा केला. दरम्यान ही गाडी दिवा स्थानकाजवळ सापडली असल्याचे पोलिसांनी सांगितले. केडीएमसी निवडणुकीच्या जाहीर सभेसाठी मुख्यमंत्री मंगळवारी डोंबिवलीच्या दौ-यावर होते. ते येण्याच्या काही तास आधी ही घटना घडल्याने पोलिसांच्या बंदोबस्तावर प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशीरा ही घटना उघडकीस आली. (प्रतिनिधी)