सीबीडी येथे दरोडा
By Admin | Updated: March 14, 2015 01:34 IST2015-03-14T01:34:42+5:302015-03-14T01:34:42+5:30
सीबीडी येथे शुक्रवारी पहाटे जबरी दरोड्याची घटना घडली. घरातील सुमारे ३ लाख रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेला असून एकजण जखमी झालेला आहे.

सीबीडी येथे दरोडा
नवी मुंबई : सीबीडी येथे शुक्रवारी पहाटे जबरी दरोड्याची घटना घडली. घरातील सुमारे ३ लाख रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेला असून एकजण जखमी झालेला आहे.
सेक्टर-८ शिवम अपार्टमेंटमध्ये पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली आहे. विवेक पाटील (५२) यांच्या घरामध्ये चौघांनी प्रवेश करून दरोडा टाकला. यावेळी विवेक पाटील यांच्यासह त्यांच्या दोन मुली व पत्नी घरामध्ये झोपलेले होते. खिडकीचे ग्रील कापून चोरटे घुसले. कपाट उघडून ते ऐवज व रोख रक्कम चोरी करत असतानाच पाटील यांना जाग आली. त्यांनी प्रतिकार केला असता त्यांचे तोंड दाबून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामध्ये पाटील यांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यानंतर लुटारूंनी ऐवजासह पळ काढला. चारही लुटारू १८ ते २५ वयोगटातील असल्याचे उपआयुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले. दरोड्यानंतर दोन मोटारसायकल सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. त्या आधारे लवकरच या लुटारूंचा शोध घेतला जाईल.