रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत प्रवाशाला लुटणारे अटकेत

By Admin | Updated: December 13, 2015 02:49 IST2015-12-13T02:49:26+5:302015-12-13T02:49:26+5:30

महिन्याभरापूर्वी बनावट रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत हार्बर रेल्वे मार्गावर कॉटनग्रीन आणि रे रोड रेल्वे स्थानकांदरम्यान प्रवाशाला लुटणाऱ्या दोघा लुटारूंना रेल्वेच्या गुन्हे शाखेने जेरबंद

The robber was threatening to rob the revolver | रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत प्रवाशाला लुटणारे अटकेत

रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत प्रवाशाला लुटणारे अटकेत

मुंबई : महिन्याभरापूर्वी बनावट रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत हार्बर रेल्वे मार्गावर कॉटनग्रीन आणि रे रोड रेल्वे स्थानकांदरम्यान प्रवाशाला लुटणाऱ्या दोघा लुटारूंना रेल्वेच्या गुन्हे शाखेने जेरबंद केले असून त्यांच्याकडून चोरलेला ऐवज हस्तगत केला आहे.
सीएसटी रेल्वे स्थानकावरून १६ नोव्हेंबरला हा प्रवासी फर्स्ट क्लासने वडाळ्याच्या दिशेने प्रवास करत होता. रात्री साडेआठच्या सुमारास ही गाडी रे रोड रेल्वे स्थानकात येताच तीन तरुण या डब्यात चढले. त्यांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत प्रवाशाकडील मोबाइल फोन, बॅग आणि रोख रक्कम असा २१ हजारांचा ऐवज लुटला. त्यानंतर गाडी कॉटनग्रीन रेल्वे स्थानकात येताच आरोपींनी पळ काढला. याबाबत वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होती.
मात्र पोलिसांच्या हाती काहीच धागेदोरे लागत नव्हते. अखेर हा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. गुन्हे शाखेने चोरलेल्या मोबाइल लोकेशनवरून गोवंडी येथून अझरुद्दीन खान (१९) याच्यासह अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले. आरोपींकडून पोलिसांनी चोरलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे. तर आरोपीने धमकावण्यासाठी वापरलेले बनावट रिव्हॉल्व्हर पोलिसांनी हस्तगत केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The robber was threatening to rob the revolver