रस्ता सुरक्षा अभियान सुरू

By Admin | Updated: January 11, 2015 22:28 IST2015-01-11T22:28:52+5:302015-01-11T22:28:52+5:30

रायगडच्या रस्ता सुरक्षा समितीतर्फे राबविण्यात येणाऱ्या रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याहस्ते उद्या सोमवारी होणार आहे.

Road safety campaign started | रस्ता सुरक्षा अभियान सुरू

रस्ता सुरक्षा अभियान सुरू

अलिबाग : रायगडच्या रस्ता सुरक्षा समितीतर्फे राबविण्यात येणाऱ्या रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याहस्ते उद्या सोमवारी होणार आहे. जि. परिषदेच्या ना. ना. पाटील सभागृहात हा कार्यक्रम सकाळी ११ वाजता होईल.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार सुभाष पाटील तर, प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे खासदार श्रीरंग बारणे, विधान परिषद सदस्य आमदार सुनील तटकरे, आमदार जयंत पाटील, आमदार अनिल तटकरे, आमदार रामनाथ मोते, आमदार निरंजन डावखरे, विधानसभा सदस्य आमदार सुरेश लाड, आमदार धैर्यशील पाटील, आमदार भरत गोगावले, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मनोहर भोईर, आमदार अवधूत तटकरे, सुरेश टोकरे, जिल्हाधिकारी सुमंत भांगे, मुख्यकार्यकारी अधिकारी सुनील पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.शशिकांत महावरकर, नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहतील. नागरिकांनीही उपस्थित राहावे असे आवाहन रस्ता सुरक्षा समितीने केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Road safety campaign started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.