आधी नालेसफाई मगच रस्ता
By Admin | Updated: May 18, 2015 22:44 IST2015-05-18T22:44:33+5:302015-05-18T22:44:33+5:30
कडवा गल्ली येथील होलसेल धान्य मार्केट परिसरातील रस्त्याचे सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्याआधी रस्त्याखाली असलेल्या भुयारी नाल्यांची सफाई चांगल्या पद्धतीने करा,

आधी नालेसफाई मगच रस्ता
ठाणे : कडवा गल्ली येथील होलसेल धान्य मार्केट परिसरातील रस्त्याचे सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्याआधी रस्त्याखाली असलेल्या भुयारी नाल्यांची सफाई चांगल्या पद्धतीने करा, तरच रस्ता बांधा, असा नारा देऊन येथील स्थानिकांसह व्यापाऱ्यांनी रस्त्याचे काम बंद पाडले.
ठाण्यातील मुख्य बाजारपेठेमधील कडवा गल्ली येथे होलसेल धान्य मार्केट आहे. या ठिकाणी दरवर्षी पावसाळ्यात गुडघाभर पाणी साचते. हे साचलेले पाणी दुकानात गेल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान होत असते. यासाठी येथे असलेल्या भुयारी नाल्याची चांगल्या प्रकारे सफाई करावी, अशी मागणी शिवसेना उपशहरप्रमुख विलास ढमाले यांच्या माध्यमातून येथील नागरिक व व्यापाऱ्यांनी निवेदनाद्वारे वारंवार महापालिकेला केली होती. परंतु, दरवर्षी थातूरमातूर सफाई केली जाते. त्यामुळे दरवर्षी या ठिकाणी पाणी साचून व्यापाऱ्यांसह रहिवाशांचे नुकसान होते. त्यामुळे सोमवारी स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांनी येथे सुरू असलेले रस्त्याचे सिमेंट कॉंक्रिटीकरणाचे काम बंद पाडले. आधी नालेसफाई करा, मगच रस्ता बांधा, असा नारा येथील रहिवाशांनी दिला.
सोमवारी महापालिकेच्या वतीने या ठिकाणी सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्यासाठी रस्ता खोदण्यासाठी कर्मचारी आले असता येथील नागरिकांनी या कामाला विरोध करून या ठिकाणी असलेला भुयारी नाला हा सुमारे १२ फूट खोल असून तो ८ फूट तुंबला आहे असा दावा येथील नागरिकांनी केला आहे. हा नाला आधी साफ करावा व मगच रस्त्याचे काम करा, अशी मागणी नागरिकांनी केली. सफाई नीट होत नसल्याने हा नाला आता संपूर्ण भरला असून तो दीड फुटावर आला आहे.
४या ठिकाणी असलेला भुयारी नाला हा सुमारे १२ फूट खोल असून तो ८ फूट तुंबला असल्याचा दावा येथील नागरिकांनी केला आहे. तो आधी साफ करावा व मगच रस्त्याचे काम करा, अशी मागणी नागरिकांनी केली. सफाई नीट होत नसल्याने हा नाला आता संपूर्ण भरला असून तो दीड फुटावर आला आहे.
४सोमवारी येथे सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्यासाठी रस्ता खोदण्याकरीता कर्मचारी आले असता येथील नागरिकांनी या कामाला विरोध केला.