Join us  

रस्त्यावरील गुन्हेगारीही होतेय अनलॉक, पोलिसांची डोकेदुखी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2020 2:37 AM

पोलिसांची डोकेदुखी वाढली : एकट्या जून महिन्यात रस्त्यांवर घडले सुमारे १ हजार गुन्हे; एप्रिल, मेपेक्षा अधिक नोंद

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात ‘लॉक’ झालेली रस्त्यावरील गुन्हेगारी पुन्हा ‘अनलॉक’ झाल्याने पोलिसांच्या डोकेदुखीत भर पडली आहे. जूनमध्ये रस्त्यावरील गुन्हेगारीच्या १ हजार २० गुन्ह्यांसह एकूण ५ हजार ७९७ गुन्हे नोंद झाले आहेत. एप्रिल आणि मे महिन्यात दाखल एकूण गुन्हे एकट्या जूनमध्ये घडले आहेत.

लॉकडाऊनचे सुरुवातीचे काही दिवस सोडले तर, मुख्यत्वेकरून एप्रिल आणि मे महिन्यात शहरातील गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात घट झाली. गेल्या वर्षीच्या एप्रिल आणि मे महिन्यात चोरीच्या अनुक्रमे ३९४ आणि ५११ म्हणजेच दोन महिन्यात एकूण तब्बल ९०५ गुन्ह्यांची नोंद झाली होती. लॉकडाऊनच्या काळात हे प्रमाण कमी होऊन एप्रिल आणि मे महिन्यात अनुक्रमे ३४ आणि ५१ म्हणजेच अवघ्या ८५ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.जबरी चोरीचेही गुन्हे गेल्या वर्षीच्या १३४ च्या नोंदीवरून अवघे २७ वर आले आहेत. तर, मे महिन्यात फक्त दोन सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत.शहरात दर महिन्याकाठी १५०हून अधिक घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद होते. एखाद्या महिन्यात तर हा आकडा २००पर्यंत पोहोचतो. मात्र लॉकडाऊनच्या एप्रिल आणि मे या दोन महिन्यात घरफोडीचे एकूण ११५ गुन्हे दाखल झाले आहेत. वाहनचोरीचे गुन्हेही कमी होऊन या दोन महिन्यात अनुक्रमे ८४ आणि १५८ अशा एकूण २४२ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तर, या दोन महिन्यात दरोड्याचा एक आणि खंडणीचे आठ गुन्हे नोंदविले गेले आहेत. मात्र जून महिन्यात अनलॉकचा टप्पा सुरू होताच गुन्हेगारांनी डोके वर काढण्यास सुरुवात केली.जून महिन्यात १३ हत्येच्या घटना घडल्या. यापैकी १२ गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांना यश आले. तर हत्येचा प्रयत्न ३६, सोनसाखळी चोरी आणि जबरी चोरीचे ३३, खंडणीचे ९, तर मारहाणीच्या ३०२ गुन्ह्यांची भर यात पडली आहे. या काळात मुंबईतून तब्बल २३५ वाहने चोरीला गेली आहेत. तर घरफोडीचे तब्बल १०५ गुन्हे नोंद झाले आहेत. तर विनयभंगाचे १०३, तर बलात्काराच्या ४६ गुन्ह्यांची नोंद पोलीस दफ्तरी झाली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीचे तब्बल १ हजार २० अधिक गुन्हे नोंद झाले आहेत. यासह नियमांचे उल्लंघन तसेच अन्य कलमान्वये दाखल एकूण ५ हजार ७९७ गुन्हे जून महिन्यात नोंद झाले आहेत.अशी घेतात पोलीस काळजीपोलिसांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठका घेण्यास सुरुवात केली. तसेच घराबाहेर पडल्यावर चेहऱ्यावर सतत मास्क असतोच. हातातील काठीपासून वाहनापर्यंत सारेच निर्जंतुक केले जाते. थेट संपर्क, हात मिळवणे आदी गोष्टी जितक्या टाळता येतील तितक्या टाळतात. घरी परतल्यावर कपडे डेटॉलच्या पाण्यात भिजवणे, आंघोळ आदी प्रक्रिया असतेच. त्यात आरोपीला पकडल्यानंतर त्याची आधी चाचणी करतात. गुन्हेगारीवर आवर घालण्यासाठी गस्त वाढविण्यात येत आहे.बंद दुकाने आणि घरांवर लुटारूंचा वॉच...लॉकडाऊनच्या एप्रिल-मे महिन्यात दाखल एकूण गुन्हे एकट्या जून महिन्यात घरफोडीचे गुन्हे घडले. यात अनेक नागरिकांनी गावाकडची वाट धरली. त्यामुळे बंद दुकाने आणि घरे लुटारूने टार्गेट केले आहेत. यात अनेक जण बेरोजगारीमुळे गुन्हे करत असल्याचेही दिसून येत आहे.गस्तीवर भरपोलीस ठाण्यातील नियमित कर्तव्यांसह टाळेबंदीच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी, विलगीकरण केंद्र, बाधितांवरील उपचार सुरू असलेल्या रुग्णालयांबाहेरील बंदोबस्त, करोनाबाधिताचा मृत्यू झाल्यास नातेवाइकांच्या जबाबांसह तपशिलांची नोंदणी, बेवारस मृतदेहांवरील अंत्यसंस्कार, मास्क न लावता बाहेर भटकणाऱ्यांची धरपकड, जोखीम पत्करून अवैधरीत्या प्रवास करणाºयांना अटकाव आदी सर्व कामे पोलीस ठाण्यांतील मनुष्यबळाकडून सुरू आहेत. यातच हळूहळू डोके वर काढत असलेल्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे. यासाठी जास्तीत जास्त गस्त वाढविण्यात येत आहे.सतर्क राहा... मुंबई पोलिसांचे आवाहन1रस्त्यावरील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांकड़ून गस्त वाढविण्यात आली आहे. तसेच नागरिकांनीही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये. स्वत:ची काळजी घेणे गरजेचे असल्याचे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.2तसेच यातही सायबर सुरक्षेबाबत नागरिकांनी अधिक सतर्क होत, आपल्या कार्डविषयीची गोपनीय माहिती कुणालाही शेअर करू नये, याबाबत मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकड़ून वेळोवेळी ट्विटर हँडलवरून आवाहन करण्यात येत आहे.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारी