Join us

छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील रस्त्याला नवीन लूक मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 06:16 IST

महापालिकेचा निर्ण; झेब्रा क्रॉसिंग, पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व महापालिका मुख्यालय या परिसरात असणाऱ्या रस्त्यांना एका आठवड्यात नवीन लूक मिळणार आहे. रस्त्यांवर झेब्रा क्रॉसिंग आणि पादचाऱ्यांना चालण्यासाठी हक्काची जागा मिळणार आहे. या कामाला मंगळवारपासून सुरुवात करण्यात आली आहे.

पालिकेच्या पुढाकाराने व ‘ब्लूमबर्ग फिलॅन्ट्रॉफिज इनिशिएटिव्ह’ यांच्या सहकार्याने २०१५ पासून मुंबईत विविध सुधारणा राबविल्या जात आहेत. यामध्ये जनजागृती अभियानांसह रस्ते व पदपथविषयक विविध अभ्यासपूर्ण अभियांत्रिकीय सुधारणांचाही समावेश आहे. याचाच भाग म्हणून आता ‘मुंबई ट्रॅफिक कंट्रोल ब्रँच’ आणि ‘सिटी ट्रान्सपोर्टेशन ऑफिशियल्स - ग्लोबल डिझायनिंग सिटीज इनिशिएटिव्ह’ यांचे सहकार्य घेऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व महापालिका मुख्यालयालगतच्या परिसरातील रस्त्यांवर पादचारीभिमुख वाहतूक व्यवस्था करण्यात येणार आहे.

या रस्त्यांच्या ज्या भागाचा वापर वाहतुकीसाठी अत्यल्प प्रमाणात होतो, असे भाग पादचाऱ्यांसाठी राखीव असणार आहेत. तसेच पादचाऱ्यांना रस्ते ओलांडणे सुलभ व्हावे, यासाठी ठिकठिकाणी विस्तीर्ण ‘झेब्रा क्रॉसिंग’देखील करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या प्रायोगिक प्रकल्पाचे काम एका आठवड्यात पूर्ण होणार आहे. त्यामुळे दिवाळीनंतर या भागाचे रुपडे पालटलेले दिसेल, असा पालिकेचा दावा आहे.

नागरिकांच्या सुचनांचा विचारच्या सुधारणा प्रायोगिक स्तरावर करण्यात येणार आहेत. त्यातून मिळणाºया प्रतिसादाचा शास्त्रीय पद्धतीने नियमित अभ्यास करण्यात येणार आहे.यासाठी नागरिकांची मते व प्रतिक्रिया विचारात घेऊन या प्रायोगिक प्रकल्पाची पुढील दिशा निश्चित केली जाणार आहे, अशी माहिती ‘ब्लूमबर्ग फिलॅन्ट्रॉफिज इनिशिएटिव्ह’ यांच्याद्वारे देण्यात आली.पालिकेच्या पुढाकाराने व ‘ब्लूमबर्ग फिलॅन्ट्रॉफिज इनिशिएटिव्ह’ यांच्या सहकार्याने २०१५ पासून मुंबईत विविध सुधारणा राबविल्या जात आहेत.

टॅग्स :छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमुंबई