Join us  

अंधेरी गोखले पुलाचा रस्ता होणार कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2018 6:16 AM

दुर्घटनाग्रस्त अंधेरी गोखले पुलाच्या मूळ रस्त्यावर पादचारी भाग उभारण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे.

मुंबई : दुर्घटनाग्रस्त अंधेरी गोखले पुलाच्या मूळ रस्त्यावर पादचारी भाग उभारण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. तब्बल महिन्याभरानंतर पुलाच्या दुरुस्तीकामाला मुहूर्त मिळाला असून नवीन पादचारी भागाच्या आराखड्याला पालिकेनेही संमती दिली आहे. तथापि पादचारी भाग उभारल्यानंतर मूळ रस्ता कमी होणार असल्याने वाहतूककोंडी जैसे थे राहणार असल्याची भीती आहे.अंधेरी गोखले पुलावर महापालिकेने पादचारी भाग उभारला होता. मात्र पादचारी भागात विविध केबल्स, पेव्हर ब्लॉकमुळे हा पादचारी भाग ३ जुलै रोजी कोसळला होता. या दुर्घटनेनंतर वाहतुकीसाठी एक मार्ग बंद करण्यात आला.पुलाच्या पादचारी भागाच्या पाडकामानंतर मुख्य रस्त्यावर सुमारे २.५ ते ३ मीटर अंतराचा पादचारी भाग उभारण्यात येईल. रस्त्याची रुंदी ९ मीटर आहे. यामुळे पादचारी भागाचे काम पूर्ण झाल्यानंतर मूळ रस्ता सुमारे ६.५ ते ६ मीटर रुंद होणार असल्याचे पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. रुंदी कमी झाल्याने वाहतूककोंडी जैसे थे राहण्याची चिन्हे आहेत.

टॅग्स :अंधेरी पूल दुर्घटना