Join us  

पावसामुळे व्हायरलचा धोका; काळजी घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2019 3:22 AM

अतिवृष्टीदरम्यान पावसाच्या साचलेल्या किंवा वाहत्या पाण्यातून नागरिकांना चालावे लागते

मुंबई : पावसामुळे वातावरणात जाणवणारा गारवा आणि पावसाने उघडीप घेतल्यानंतर जाणवणाऱ्या उष्णतेमुळे साथीच्या आजारांचा धोका वाढत आहे. शहर-उपनगरात सर्दी, डोकेदुखी, घसा खवखवणे-दुखणे, अंगदुखी, ताप असा त्रास होणाºया रुग्णांची संख्या वाढली आहे. वेळीच प्राथमिक लक्षणे ओळखून त्वरित वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

अतिवृष्टीदरम्यान पावसाच्या साचलेल्या किंवा वाहत्या पाण्यातून नागरिकांना चालावे लागते. याच पाण्यात लेप्टोस्पायरोसिस या रोगाचे ‘लेप्टोस्पायरा’ (स्पायराकिट्स) या सूक्ष्मजंतूचा प्रादुर्भाव असू शकतो. उंदीर, कुत्रे, घोडे, म्हशी इत्यादी प्राण्यांच्या लघवीद्वारे (मूत्रातून) लेप्टोचे सूक्ष्मजंतू पावसाच्या पाण्यात संसर्गित होतात. पावसाच्या पाण्याशी संपर्क आलेल्या व्यक्तींनी २४ ते ७२ तासांच्या आत वैद्यकीय सल्ला घेऊन प्रतिबंधात्मक औषधोपचार करणे आवश्यक आहे़ विषाणू संसर्गामुळे येणारे ताप, पोटदुखी यांचे प्रमाण त्यामुळे वाढू शकते. डेंग्यूच्या विषाणूंचा प्रसारही या काळात वेगाने होतो. विषाणूसंसर्गामुळे होणारे आजार दोन ते तीन दिवसांत बरे होतात. मात्र तसे झाले नाही तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी दिली.

टॅग्स :मुंबईपाऊस