रुणवाल फाउंडेशनचा कॅन्सर रुग्णांना दिलासा
By Admin | Updated: November 15, 2014 02:39 IST2014-11-15T02:39:34+5:302014-11-15T02:39:34+5:30
श्री सुभाष रुणवाल एज्युकेशन फाउंडेशनच्या सहकार्याने देशातील पहिल्या अत्याधुनिक मोबाइल कॅन्सर डिटेक्शन सेंटर असलेल्या व्हॅनचे गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

रुणवाल फाउंडेशनचा कॅन्सर रुग्णांना दिलासा
मुंबई : अखिल भारतीय मारवाडी युवा मंच व ग्लोबल मारवाडी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि श्री सुभाष रुणवाल एज्युकेशन फाउंडेशनच्या सहकार्याने देशातील पहिल्या अत्याधुनिक मोबाइल कॅन्सर डिटेक्शन सेंटर असलेल्या व्हॅनचे गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झालेल्या कार्यक्रमात रुणवाल ग्रुपचे अध्यक्ष सुभाषचंद्र रुणवाल, त्यांच्या पत्नी चंदा रुणवाल, अ़भा़ मारवाडी युवा मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी, आमदार राज पुरोहित आदी उपस्थित होते.
मिशन कॅन्सर कंट्रोल उपक्रमांतर्गत ‘खोजो कॅन्सर, मिटाओ कॅन्सर’ या कॅन्सर जनजागृती अभियानांतर्गत कॅन्सरचे निदान करण्यासाठी आवश्यक ती सर्व उपकरणो या व्हॅनमध्ये आहेत. या उपक्रमाचा ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून क्रिकेटपटू युवराज सिंग याला नेमण्यात आले आहे. सुभाषचंद्र रुणवाल म्हणाले, ‘धुळे येथे कॅन्सर रुग्णांसाठी रुग्णालय बांधण्याची इच्छा होती. मात्र, या व्हॅनला अर्थसाहाय्य करून समाधान मिळाले आहे.
काही वर्षापूर्वी माङया सास:यांना कॅन्सर झाल्याचे उशिरा निदान झाले. त्यामुळे त्यांना जीव गमवावा लागला होता. ती सल मनात होती. त्यामुळे अधिकाधिक रुग्णांचे वेळेत निदान करून उपचार घेण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.’ ही व्हॅन शुक्रवारी आसाम येथे रवाना झाली असून, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, बिहार आदी राज्यांसह सर्व देशभर फिरणार आहे. एका दिवसात 3क्क् रुग्ण तपासण्याची तिची क्षमता आहे. ही एक व्हॅन तयार करण्यासाठी सुमारे 3 कोटी रुपये खर्च आला असून, अशा प्रकारच्या 4 व्हॅन सुरू करण्याचा संस्थेचा मानस असल्याचे रुणवाल यांनी सांगितल़े (प्रतिनिधी)
अत्याधुनिक मोबाइल कॅन्सर डिटेक्शन सेंटरमध्ये मॅमोग्राफी मशिन असून, त्यात कॅन्सरची लागण झाली आहे की नाही, याची प्राथमिक तपासणी करता येते. त्यानंतर आवश्यक बायोस्पी मशिनही या व्हॅनमध्ये आहे. फुप्फुसाच्या कॅन्सरची तपासणी करण्यासाठी आवश्यक एक्स-रे मशिनही यामध्ये बसवली आहे. शिवाय सीआर सिस्टीम, सोलार पॅनल, हायड्रोलिक सेंटर, युरिन सँपलसाठी टॉयलेट आदी उपकरणांनी सुसज्ज असे हे सेंटर आहे.