अंध-अपंगांना हक्काची घरे
By Admin | Updated: November 9, 2014 00:25 IST2014-11-09T00:25:29+5:302014-11-09T00:25:29+5:30
शारीरिक व्यंग असतानाही मोठय़ा जिद्दीने जगण्यासाठीची लढाई लढत असलेल्या अंध-अपंगांना आता महानगरात हक्काचे घर मिळविण्याची संधी मिळणार आहे.

अंध-अपंगांना हक्काची घरे
मुंबई : शारीरिक व्यंग असतानाही मोठय़ा जिद्दीने जगण्यासाठीची लढाई लढत असलेल्या अंध-अपंगांना आता महानगरात हक्काचे घर मिळविण्याची संधी मिळणार आहे. म्हाडाकडून शहर व उपनगरातील विविध ठिकाणच्या गृहयोजनेमध्ये त्यांच्यासाठी राखीव ठेवलेल्या 49 घरांची सोडत काढण्यात येणार आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार या महिन्यात त्यासाठी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. येत्या दहा-बारा दिवसांमध्ये त्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे सूत्रंकडून सांगण्यात आले.
म्हाडाकडून काढण्यात येणा:या घराच्या लॉटरीसाठी सवर्गात अंध व अपंग संवर्गाबाबतच्या नियमाविरोधात 2क्क्9 मध्ये उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामुळे 2क्11 व 12 मध्ये काढलेल्या सोडतीमध्ये या गटातील एकूण 49 घरे स्थगित ठेवण्यात आली होती. त्याबाबतचा खटला निकाली लागल्याने आता त्यांच्या सोडतीचा मार्ग मोकळा झाला आहे. या गटामध्ये नव्याने निश्चित केलेल्या विविध 7 प्रवर्गातील व्यक्ती त्यासाठी पात्र ठरणार आहेत. या व गेल्या वर्षीची सोडत त्याच पद्धतीने काढण्यात आली होती.
म्हाडाच्या पूर्वीच्या नियमानुसार या कोटय़ामध्ये अंध, अपंग व दुर्धर व्याधीने त्रस्त असलेल्या व्यक्ती या गटातील अर्जासाठी पात्र होत्या. मात्र आता खंडपीठाच्या निर्देशानुसार त्यामध्ये पूर्ण अंध, कमी दृष्टी, कुष्ठरोगमुक्त, कर्णबधिर, अवयवातील कमतरता, मतिमंदत्व आणि मनोविकृती या प्रवर्गाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे उपरोक्त व्याधीने ग्रस्त असलेल्यांना या कोटय़ामधून घर मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. (प्रतिनिधी)
च्खंडपीठाने राखीव ठेवण्यात आलेल्या 2क्12 मधील 41 व 2क्13 मधील 8 घरांच्या सोडतीची प्रक्रिया नोव्हेंबर्पयत कार्यान्वित करण्याचे आदेश दिले होते.
च्त्यानुसार येत्या पंधरवडय़ात त्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करून पुढील महिन्यात प्रत्यक्ष लॉटरी काढली जाईल. लवकरच त्यासाठीचे वेळापत्रक जाहीर केले जाणार असल्याचे अधिका:यांकडून सांगण्यात आले.