अभी तो हम जवां हैं...!

By Admin | Updated: February 15, 2015 01:03 IST2015-02-15T01:03:27+5:302015-02-15T01:03:27+5:30

व्हॅलेंटाइन्स डेबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचताच सगळीकडे प्रेमळ माहोलात हा दिवस अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

Right now we are young ...! | अभी तो हम जवां हैं...!

अभी तो हम जवां हैं...!

व्हॅलेंटाइन्स डेबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचताच सगळीकडे प्रेमळ माहोलात हा दिवस अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. याचे निमित्त साधून ‘हेल्पएज इंडिया’ संस्थेने ज्येष्ठ नागरिकांसाठी एका आगळ््यावेगळ््या व्हॅलेंटाइन्स डेचे आयोजन केले. व्हॅलेंटाइन्स डेच्या निमित्ताने आजच्या तरुणाईला समाजापासून दुरावलेल्या आजी-आजोबांसोबत व्हॅलेंटाइन्स डे साजरा करण्याची संधी मिळाली.
शिवाजी पार्क येथील आजी-आजोबा उद्यानात शनिवारी सकाळी हा आगळावेगळा व्हॅलेंटाइन्स डे साजरा झाला. प्रचंड उत्साहात पार पडलेल्या या खास व्हॅलेंटाइन्स डे सेलीब्रेशनमध्ये १६० ते १७० ज्येष्ठ नागरिकांसह ज्येष्ठ कपल्सही आपापल्या व्हॅलेंटाइनसोबत सहभागी झाली होती.
या सेलीब्रेशन मूडमध्ये विविध संस्था आणि महाविद्यालयांतील सुमारे ५० ते ६० विद्यार्थ्यांसमवेत ही मैफील रंगली. शोले चित्रपटातील डायलॉग्स म्हणत, मराठी-हिंदी जुनी भावगीते, नाट्यगीते गात आणि आपल्या व्हॅलेंटाइनला लाल गुलाबपुष्पांचा पे्रमळ नजराणा देत या एव्हरग्रीन कपल्सनी आपले प्रेम व्यक्त केले.

Web Title: Right now we are young ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.