कुडपण रस्त्यावर दरड कोसळली
By Admin | Updated: June 27, 2015 22:35 IST2015-06-27T22:35:34+5:302015-06-27T22:35:34+5:30
पोलादपूर तालुक्यातील नव्याने उदयास आलेले पर्यटनस्थळ कुडपण येथे गेले काही दिवस रस्त्यावर सतत येणाऱ्या दरडींमुळे वाहतूक ठप्प झाली होती.

कुडपण रस्त्यावर दरड कोसळली
पोलादपूर : पोलादपूर तालुक्यातील नव्याने उदयास आलेले पर्यटनस्थळ कुडपण येथे गेले काही दिवस रस्त्यावर सतत येणाऱ्या दरडींमुळे वाहतूक ठप्प झाली होती.
कुडपण रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येत असून बांधकाम विभागाने याची दखल घेऊन तातडीने दरड बाजूला केली. रस्त्यावर भलेमोठे दगड आल्याने जेसीबीने सुद्धा हे दगड बाजूला करणे कठीण जात होते. त्यामुळे बे्रकरच्या सहाय्याने दगड फोडण्यात आला.
पावसाळ्याअगोदरच या रस्त्याचे रुंदीकरण व चढ काढण्याचे काम चालू होते. त्यामुळे रस्त्यावर सर्व भराव येऊन काही दिवस एसटी वाहतूक बंद होती. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय झाली होती.
मात्र बांधकाम विभागाने आलेला भराव बाजूला करून वाहतूक सुरू करण्यात यश मिळविले आहे. कुडपण हा निसर्गरम्य परिसर असून पावसाळी वाहणारे नयनरम्य धबधबे पर्यटकांना खुणावत असतो. त्यामुळे येथील वाहतूक सुरळीत ठेवणे गरजेचे आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे जाधव (उपअभियंता) व खेडेकर हे जातीने उपस्थित राहून दरड बाजूला करत होते. (वार्ताहर)