Join us
Daily Top 2Weekly Top 5

ओला, उबरचा वापर करता? मग तुमची माहिती देताना सावध व्हा; अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 09:24 IST

गेल्या काही वर्षांमध्ये कॅब ॲग्रिगेटर ॲप्सचा वापर वाढला आहे. नाव, पत्ता, माेबाइल क्रमांक इत्यादी महत्त्वाची माहिती या ॲपच्या माध्यमातून गाेळा करण्यात येते.

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांमध्ये कॅब ॲग्रिगेटर ॲप्सचा वापर वाढला आहे. नाव, पत्ता, माेबाइल क्रमांक इत्यादी महत्त्वाची माहिती या ॲपच्या माध्यमातून गाेळा करण्यात येते. अधिक चांगली सुविधा देण्याच्या नावाखाली असे करण्यात येते. मात्र, अनेक ॲप्सकडून तुमच्या माहितीचा गैरवापर हाेताे. गाेळा केलेली माहिती थर्ड पार्टी कंपन्यांना विकण्यात येते. त्यामुळे या अशा ॲप्सवर माहिती देताना सावध राहण्याची गरज आहे.सर्फशार्क या सायबर सिक्युरिटी कंपनीने केलेल्या अभ्यासातून ही माहिती उघड झाली आहे. त्यानुसार उबर, ग्रॅबटॅक्सी आणि यांडेक्स गाे या कंपन्या सर्वाधिक माहिती गाेळा करतात. त्यात ओला ही भारतीय कंपनीही मागे नाही. या यादीत ओला सहाव्या स्थानी आहे. तुमची माहिती गाेळा करून ती जाहिरात देणाऱ्या कंपन्यांना विकण्यात येते. सर्फशार्कच्या अहवालानुसार ९ कंपन्या युजर्सची माहिती थर्ड पार्टी जाहिरातींसाठी वापरतात. त्यात नाव, पत्ता, माेबाइल क्रमांक, ई-मेल आयडी इत्यादी माहितीचा समावेश आहे. उबर आणि लिफ्ट यासारखे ॲप्स वंश, जाती, प्रेग्नंसी, चाइल्ड बर्थ, बायेमेट्रिक यासारखी संवेदनशील माहितीही गाेळा करतात.

टॅग्स :ओलाउबर