रिक्षा-टॅक्सीच्या भाडयात २ रूपयांची वाढ
By Admin | Updated: August 12, 2014 19:41 IST2014-08-12T19:41:02+5:302014-08-12T19:41:02+5:30
मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात रिक्षा-टॅक्सीने प्रवास करणा-यांसाठी बॅड न्यूज असून त्यांना आता यापुढे प्रवासासाठी २ रूपये जास्तीचे मोजावे लागणार आहेत.

रिक्षा-टॅक्सीच्या भाडयात २ रूपयांची वाढ
>ऑनलाइन टीम
मुंबई, दि. १२ - मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात रिक्षा-टॅक्सीने प्रवास करणा-यांसाठी बॅड न्यूज असून त्यांना आता यापुढे प्रवासासाठी २ रूपये जास्तीचे मोजावे लागणार आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखविल्याने रिक्षाचे किमान भाडे १५ रूपयावरून १७ तर टॅक्सीचे १९ वरून २१ रूपये करण्यात आले आहे. ही भाडेवाढ आज मध्यरात्रीपासून लागू करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यादिनी पेट्रोलच्या दरात दोन ते अडीच रूपयांने कपात होणार या बातमीने मुंबईकरांसाठी गुड न्यूज येण्याआधीच रिक्षा-टॅक्सीच्या २ रूपयांच्या भाडेवाडीमुळे मुंबईकरांच्या आनंदावर पाणी फिरले आहे. रिक्षा-टॅक्सी चालकांना मीटर प्रमाणित करून घ्यावे लागणार असून त्यासाठी ४५ दिवसांची मुदत देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.