रिक्षा स्टँडमध्ये महिलांच्या स्वतंत्र रांगेला संघटनांच्या अल्प प्रतिसादाने खो!
By Admin | Updated: September 5, 2014 23:15 IST2014-09-05T23:15:56+5:302014-09-05T23:15:56+5:30
लाखाहून अधिक संख्येने रिक्षाने प्रवास करणा-या डोंबिवलीकर महिलांसाठी अधिकृत रिक्षा स्टँडमध्ये स्वतंत्र रांगेचा प्रस्ताव जुलैमध्ये विचाराधीन होता,

रिक्षा स्टँडमध्ये महिलांच्या स्वतंत्र रांगेला संघटनांच्या अल्प प्रतिसादाने खो!
अनिकेत घमंडी ल्ल डोंबिवली
लाखाहून अधिक संख्येने रिक्षाने प्रवास करणा-या डोंबिवलीकर महिलांसाठी अधिकृत रिक्षा स्टँडमध्ये स्वतंत्र रांगेचा प्रस्ताव जुलैमध्ये विचाराधीन होता, मात्र संबंधित रिक्षा संघटना अन् काही प्रवाशांच्या अल्प प्रतिसादाने ही संकल्पना अंमलात येण्याआगोदरच बासनात गुंडाळली जाणार असल्याची माहितीएका ज्येष्ठ पोलीसअधिका-याने ‘लोकमत’ दिली.
हा प्रस्ताव मान्य झाल्यास सध्याच्या प्रचंड गर्दीतून आणि काही पुरूषांच्या धक्कयांसह अन्य प्रकारांमधून सुटका होणार असल्याने त्या ठिकाणच्या महिलांसाठी हा उपक्रम स्तुत्य असल्याची नागरिकांची भावनाहोती. हा प्रस्ताव डोंबिवली शहर वाहतूक शाखेला रामनगर पोलिस ठाण्याने दिला होता, त्यासाठी दोन महिन्यांपूर्वीच बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये सहाय्यक पोलिस आयुक्त (कल्याण) एस.के.डुबल, रामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल शिवरकर, शहर वाहतूक पोलिस अधिकारी, आमदार रवींद्र चव्हाणांसह बहुतांशी रिक्षा युनियनचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने त्यावर त्यांची ‘स्वतंत्र रांग’ ही ‘मात्र’ असल्याचे त्या चर्चेत पोलिसांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार शिवरकर यांनी आक्षेप घेऊन प्रायोगिक तत्वावर रामनगरच्या स्टँडवर ही सुविधा सुरु करावी, महिला प्रवाशांना याचा किती लाभ होतो, ते कळाले असते.
रिक्षेतून प्रवास करणा-या महिला प्रवाशांची स्वतंत्र रांग याबाबत बैठक घेण्यात आली होती, मात्र प्रत्यक्षात या संकल्पेनेच्या अंमलबजावणीआधी मिळालेल्या अल्प प्रतिसादामुळे ती सुविधा अद्याप सुरु झालेली नाही. त्यावर अन्य काही तोडगा काढत प्रवास सुटसूटीत कसा करता येईल, याबाबत विचार करण्यात येत आहे.
- एस.के.डुबल, (सहाय्यक उपायुक्त,वाहतूक कल्याण विभाग)
च््आता कल्याणमध्येही असा प्रस्ताव येत आहे, मात्र आधी डोंबिवलीत त्याची अंमलबजावणी करून त्यात कोणते अडथळे येतात, ते बघावे, अन्यथा केवळ घोषणा-आश्वासने देऊन राजकारण्यांसारखे धोरण पोलिस खात्याचे(वाहतूक) अशी टीका नागरिकांमधून व्यक्त होत आहे.