रिक्षाचालकांची अशीही ‘घुसखोरी’

By Admin | Updated: September 6, 2014 01:02 IST2014-09-06T01:02:49+5:302014-09-06T01:02:49+5:30

बाद झालेल्या टॅक्सी परवान्यांचे नव्याने नूतनीकरण करून वाटप करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे.

Rickshaw pulls 'infiltration' | रिक्षाचालकांची अशीही ‘घुसखोरी’

रिक्षाचालकांची अशीही ‘घुसखोरी’

मुंबई : बाद झालेल्या टॅक्सी परवान्यांचे नव्याने नूतनीकरण करून वाटप करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. 7 हजार 843 टॅक्सी परवान्यांसाठी 6 ते 20 सप्टेंबर्पयत ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा जाहीर करण्यात आली आहे. मात्र या परवान्यांचे वाटप करण्यासाठी परिवहन विभागाने घातलेल्या अटी आणि शर्तीमध्ये अर्जदाराकडे हलके मोटार वाहन किंवा परिवहन वाहनाचे लायसन्स तसेच ऑटोरिक्षा अथवा टॅक्सी बॅच असणो आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. यात ऑटोरिक्षा बॅच असण्याचे नमूद केल्यामुळे रिक्षाचालकांनाही टॅक्सी परवान्यांसाठी अर्ज करता येणार आहे.
या नवीन अटीमुळे अनेक गरजू वंचित राहण्याची शक्यता आहे.  टॅक्सीच्या बाद झालेल्या परवान्यांचे परिवहन विभागाकडून नव्याने नूतनीकरण करून वाटप करण्याची प्रक्रिया गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होती. जवळपास असे 15 हजार बाद टॅक्सी परवाने असून, यातील 7 हजार 843 परवान्यांचे मुंबई महानगर परिवहन प्राधिकरण क्षेत्रत आता नव्याने वाटप करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. यासाठी 6 ते 20 सप्टेंबर्पयत दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजेर्पयत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. तर ऑनलाइन देयक भरण्याची सुविधा 6 ते 22 सप्टेंबर्पयत दुपारी 3 ते संध्याकाळी 6र्पयत उपलब्ध होईल. ऑनलाइन अर्ज प्रक्रियेसाठी 1क्क् रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. पात्र उमेदवाराला ऑनलाइन अर्ज 3ं7्रस्री1्रे3.ेंँंल्ल’्रल्ली.ॅ5.्रल्ल वेबसाइटवर याच कालावधीत सादर करणो आवश्यक राहील. लॉटरी पद्धतीने अर्जदाराची निवड केली जाईल.  लॉटरीची सोडत 10 ऑक्टोबर किंवा अन्य दिवशी काढली जाणार आहे. 
परिवहन विभागाच्या  संकेतस्थळावरही सोडतीचा निकाल प्रसिद्ध केला जाणार   आहे. अर्जदारांना घातलेल्या अटींमध्ये हलके मोटार वाहन किंवा परिवहन वाहनाचे लायसन्स तसेच ऑटोरिक्षा अथवा टॅक्सी बॅच असणो आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. यात रिक्षाचालकाच्या बॅचबाबत नव्यानेच अट नमूद केल्याने रिक्षाचालकही या परवान्यांसाठी अर्ज करू शकणार आहेत. (प्रतिनिधी)  
 
या परवान्यांचे वाटप ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याने हे अर्ज केलेल्या रिक्षाचालकांनाही मिळाल्यास गरजूला यापासून वंचित राहावे लागेल.
 
महत्त्वाचे.. : यशस्वी अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रे पडताळणीसाठी निकाल लागल्यानंतर संबंधित प्रादेशिक किंवा उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात 31 ऑक्टोबर 2014र्पयत सादर करणो आवश्यक राहणार आहे.  
 
रिक्षा बॅचधारकांनाही यासाठी अर्ज करता येणार आहे. हा धोरणात्मक निर्णय आहे आणि तो नव्यानेच या अटीत नमूद करण्यात आला आहे. ऑनलाइन पद्धतीने या परवान्यांचे वाटप होणार असल्याने हे परवाने कुणाकुणाला मिळतील ते सांगणो कठीण आहे.  
- सतीश सहस्रबुद्धे 
(अपर परिवहन आयुक्त)

 

Web Title: Rickshaw pulls 'infiltration'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.