रिक्षाचालकांची खड्डे बुजवा मोहीम
By Admin | Updated: August 12, 2014 00:23 IST2014-08-11T23:45:39+5:302014-08-12T00:23:23+5:30
डहाणू तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अतिवृष्टीमुळे दुरवस्था झाली आहे. या खड्ड्यांमुळे प्रवास करणे मोठे जिकिरीचे झाले आहे

रिक्षाचालकांची खड्डे बुजवा मोहीम
शशिकांत ठाकूर, कासा
डहाणू तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अतिवृष्टीमुळे दुरवस्था झाली आहे. या खड्ड्यांमुळे प्रवास करणे मोठे जिकिरीचे झाले आहे, मात्र स्थानिक ग्रामपंचायत व बांधकाम विभागातील अधिकारी खड्डे बुजविण्याची वारंवार मागणी करुनही दुर्लक्ष करत असल्याने तालुक्यातील सारणी - उर्से रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी अखेर रिक्षा चालकांनीच पुढाकार घेतला.
तालुक्यातील सारणी - उर्से या सुमारे ७ कि.मी. रस्त्यावर अती पावसामुळे ठिकठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहेत, तर काही ठिकाणी मोऱ्यांचा भराव वाहून गेल्याने धोकादायक खड्डे झाले आहे. या रस्त्यालगत सारणी, निकावली, आंबिवली, म्हसाड, उर्से, साये, आंबिस्ते व दाभोण आदी गावे आहेत. या गावांना बाजारपेठेसाठी चारोटी, कासा, डहाणूकडे यावे लागते, त्यामुळे नागरिकांची व वाहनांची तसेच प्रवासी वाहनांची सतत वर्दळ असते. पावसाळ्यात या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना प्रवास करणे धोकादायक झाले होते. पावसाळ्यात खड्डे पाण्याने भरल्याने रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांना प्रवास करणे अडचणीचे झाले होते.