विद्यार्थिनीचे फोटो काढणाऱ्या रिक्षाचालकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:06 IST2021-03-19T04:06:28+5:302021-03-19T04:06:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अंधेरीच्या रेल्वे तिकीट काऊंटरजवळ उभ्या असलेल्या विद्यार्थिनीचे लपून फोटो काढण्याचा प्रकार अंधेरीत घडला. ...

Rickshaw puller arrested for taking photos of student | विद्यार्थिनीचे फोटो काढणाऱ्या रिक्षाचालकाला अटक

विद्यार्थिनीचे फोटो काढणाऱ्या रिक्षाचालकाला अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अंधेरीच्या रेल्वे तिकीट काऊंटरजवळ उभ्या असलेल्या विद्यार्थिनीचे लपून फोटो काढण्याचा प्रकार अंधेरीत घडला. ही बाब तिच्या मित्राच्या लक्षात येताच त्याने फोटो काढणाऱ्याला जाब विचारून पोलिसांच्या ताब्यात दिले.

प्रेमचंद यादव (२७) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून ताे रिक्षाचालक आहे. गुरुवारी दुपारी अंधेरी पश्चिमेतील तिकीट काऊंटरजवळ १९ वर्षांची विद्यार्थिनी तिच्या मित्रासोबत लोकलची वाट पाहत उभी होती. त्याच वेळी यादव त्याच्या मोबाइलने विद्यार्थिनीचे फोटो काढत होता. जे विद्यार्थिनीच्या मित्राने पाहिले आणि यादवला जाब विचारला. तेव्हा फोटो काढले नाहीत असे त्याने सांगितले. मात्र त्याच्या मोबाइलमध्ये विद्यार्थिनीसह अन्य महिलांचे आक्षेपार्ह फोटो सापडले. ते फोटो नात्यातील महिलांचे आहेत असे त्याने सांगितले. त्याला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्यावर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला.

.................................

Web Title: Rickshaw puller arrested for taking photos of student