Join us  

जगभरातील श्रीमंतांपैकी या व्यावसायिकांचे मुंबईशी असं कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2017 7:07 PM

हे काही मुळचे मुंबईचे दिग्गज आहेत ज्यांना जगभरातील श्रीमंतांपैकी एक गणले जाते.

ठळक मुद्देमुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने मुख्य उद्योगधंदे इथेच केंद्रींत आहेत.यापैकी बऱ्याच व्यावसायिकांची जन्मभूमी, शिक्षण किंवा कर्मभूमी मुंबईच असते.

मुंबई : मुंबईला भारताची आर्थिक राजधानी म्हटलं जातं. अनेक व्यवसाय, उद्योगधंदे करून अनेकांनी गडगंज संपत्ती कमवली. अगदी रस्त्यावर वडापाव विकणारा सामान्य माणसाचीही उलाढाल आता लाखोंच्या घरात गेलीय. जगभरात श्रीमंत व्यक्ती म्हणून गणले गेलेले प्रसिद्ध व्यावसायिक मुळचे मुंबईकर आहेत. अशाच काही मुंबईकरांविषयी आज पाहुया.

मुकेश अंबानी

१.८ मिलिअन डॉलर एवढी आर्थिक उलाढाल असलेले मुकेश अंबानी मुंबईतीलच नव्हेतर संपूर्ण जगात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात. रिलायन्स इंडस्ट्रीचे ते अध्यक्ष असून २०१४ साली फोर्बने प्रसिद्ध केलेल्या जगातील श्रीमंत व्यक्तींमध्ये ३६ व्या क्रमांकावर होते. २०१३ साली आशिया खंडातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती म्हणूनही गणले गेले आहेत. मुंबईतील अॅन्टिलियामध्ये ते राहत असून जगातील सगळ्यात महागड्या घरांमध्ये यांच्या बंगल्याची गणना केली जाते.

कुमार बिर्ला

आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष असलेले कुमार बिर्ला यांचं लहानपण मुंबईत गेलंय. मुंबई विद्यापीठातूनच त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलंय. ८.५ मिलिअन डॉलरचे मालक असलेले कुमार बिर्ला यांचं बालपण मुंबईत गेल्याने मुंबईकरांना त्यांचा अभिमान आहे.

उदय कोटक

जगातील तरुण उद्योजक म्हणून नावारुपाला आलेले उदय कोटक हेसुद्धा मुंबईकर आहेत. कोटक समुहाचे अध्यक्ष उदय कोटक हे गणित या विषयात फार चतुर होते. मुंबईतल्या सिड्नहॅम कॉलेजमधून त्यांनी बी.कॉमची पदवी घेतली. तर जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमधून त्यांनी व्यवस्थापनात पदव्युत्तर शिक्षण घेतलं. २०१६ साली फोर्बने प्रसिद्ध केलेल्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत उदय कोटक यांचा समावेश होता. 

शशी आणि रवि रुईया

इस्सार ग्रुपची स्थापना करणारे शशी आणि रवि रुईया हे बंधूही श्रीमंत माणसांच्या यादीत आहे. या दोघांचंही शिक्षण चेन्नईत झालेलं असलं तरीही ते आता मुंबईत राहतात. २०१२ साली त्यांना जगात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जाणारे हे पहिले भारतीय आहेत.

मधुकर पारेख

पिडिलाईट इंडस्ट्रीचे अध्यक्ष असलेले मधुकर पारेख हेसुद्धा मुंबईकर आहे. त्यांनी मुंबई विद्यापीठातून बॅचलर ऑफ सायन्स इन इंजिनिअरिंगची पदवी घेतलीय. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी युएसमध्ये गेले. तिकडेच त्यांनी एका कंपनीत नोकरी केली. त्यानंतर १९७१ साली त्यांनी आपल्या वडिलांच्या पिडिलाईट इंडस्ट्रिमध्ये पदार्पण केलं. श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांचा भारतात ३४ वा क्रमांक लागतो. ते आजघडीला २.४ बिलिअन डॉलरचे मालक आहेत. 

अनिल अंबानी

धिरुभाई अंबानींचे सगळ्यात लहान चिरंजीव अनिल अंबांनी यांचंही बालपण मुंबईत गेलंय. मुंबईच्या के.सी कॉलेजमधून त्यांनी बी.एस.सी पूर्ण केलंय. त्यांनी त्यांच्या इतर व्यवसायांप्रमाणेच बॉलिवूड क्षेत्रातही अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. रिलायंन्स कॅपिटल, रिलायंन्स इन्फ्रास्ट्रक्चर, रिलायन्स पॉवर, रिलायन्स कम्यूनिकेशन अशा विविध कंपनीवर त्यांचं लक्ष असतं. आजघडीला त्यांची २.९ बिलिअन एवढी संपत्ती आहे. 

विजय चौहान

पार्ले प्रोडक्ट्सचे मालक विजय चौहान हे भारतातील श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जातात. विलेपार्लेत त्याचं पार्ले प्रोडक्टचा कारखाना आहे. पार्ले प्रोडक्ट हे देशभरात प्रसिद्ध आहे आणि या प्रोडक्टचा मुख्य कारखाना मुंबईत असल्याने मुंबईकरांना या गोष्टीचा फार अभिमान आहे. 

टॅग्स :मुंबईमुकेश अंबानीअनिल अंबानीभारत