रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून लुबाडले

By Admin | Updated: July 13, 2014 23:01 IST2014-07-13T21:31:56+5:302014-07-13T23:01:55+5:30

पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आलेल्या शक्ती ऑनलाइन लॉटरी दुकानात एका त्रिकुटाने शिरकाव करून रिव्हॉल्व्हर आणि तलवारीचा धाक दाखवून हजारो रुपये घेऊन रिक्षातून पोबारा केला

Revolver was scared and looted | रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून लुबाडले

रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून लुबाडले

ठाणे - पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आलेल्या शक्ती ऑनलाइन लॉटरी दुकानात एका त्रिकुटाने शिरकाव करून रिव्हॉल्व्हर आणि तलवारीचा धाक दाखवून हजारो रुपये घेऊन रिक्षातून पोबारा केला. ही घटना शनिवारी रात्री हरिनिवास सर्कलजवळ घडली असून याप्रकरणी संजू बोदी यांनी तिघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच दुकानातील गल्ल्यातील आणि तेथे आलेल्या गिर्‍हाइकांच्या खिशातून अशी ३१ हजारांची रोकड जबरदस्तीने काढल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(प्रतिनिधी)
................

Web Title: Revolver was scared and looted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.