सीए परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर
By रेश्मा शिवडेकर | Updated: March 19, 2024 21:03 IST2024-03-19T21:02:46+5:302024-03-19T21:03:02+5:30
सुधारित वेळापत्रक मंगळवारी सायंकाळी जाहीर करण्यात आले.

सीए परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर
मुंबई : लोकसभा निवडणुकीमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या सीए इंटरमिजिएट आणि फायनल परीक्षांचे सुधारित वेळापत्रक मंगळवारी सायंकाळी जाहीर करण्यात आले.
सुधारित वेळापत्रकानुसार सीए इंटरमिजिएट गट १ ची परीक्षा ३, ५ आणि ९ मे रोजी होणार आहे. तर गट २ ची परीक्षा ११, १५ आणि १७ मे रोजी होणार आहे. सीए फायनल गट १ ची परीक्षा २, ४ आणि ८ मे रोजी होईल. तर गट २ ची परीक्षा १०, १४ आणि १६ मे रोजी होईल. इंटरनॅशनल टॅक्सेशनची परीक्षा १४ आणि १६ मे रोजी होईल. अन्य परीक्षांच्या तारखा आधीच्या वेळापत्रकानुसारच होतील, असे ‘दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटट्स ऑफ इंडिया’च्या (आयसीएआय) परीक्षा विभागाचे संचालक एस. के. गर्ग यांनी कळविले आहे. मे महिन्यात देशभरात अनेक ठिकाणी मतदान होणार असल्याने या परीक्षांच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत. आधीचे आणि सुधारित वेळापत्रक परीक्षार्थींना www.icai.org या संकेतस्थळावर पाहता येईल.